व्हिटॅमिन ई (Vitamin E) हे केवळ आपल्या केसांसाठीच फायदेशीर नव्हे तर त्वचेसाठीही (beneficial for skin and hair) लाभदायक ठरते. व्हिटॅमिन ई हे एक ॲंटी-ऑक्सीडेंट असून ते फ्री रॅडिकल्सचे परिणाम रोखू शकते. तसेच आपल्या त्वचेचे नुकसान होण्यापासूनही (skin care) वाचवते. कदाचित तुम्हाला हे वाचूनही आश्चर्य वाटेल की फ्री रॅडिकल्स बऱ्याचदा अकाली वृद्धापकाळास कारणीभूत ठरतात. म्हणूनच आहारात व्हिटॅमिन ई चा समावेश करावा, अशी शिफारस तज्ज्ञ करतात. घरी बसल्या बसल्या व्हिटॅमिन ईचा फेस पॅक कसा बनवावा आणि त्वचा चमकदार कशी बनवावी, हे जाणून घेऊया.
तुम्ही व्हिटॅमिन ई आणि कोरफडीच्या रसाचा फेसपॅक बनवू शकता. त्यासाठी कोरफडीच्या पानातून त्याचा रस किंवा जेल काढून घ्या. त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल घाला आणि नीट मिसळा. हा फेसपॅक बनवल्यानंतर तो आपल्या चेहऱ्यावर लावा आणि थोडा वेळ वाळू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
तुम्ही ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई चा फेसपॅकही घरी तयार करू शकता. त्यासाठी एका भांड्यात थोडं ग्लिसरीन, गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई तेल एकत्र करून व्यवस्थित मिक्स करावे. हे मिश्रण तुमच्या त्वचेवर लावून थोडा वेळ तसेच राहू द्या. किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे त्वचेवर लावा आणि साकळी साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.
पपई आणि व्हिटॅमिन ईचा फेसपॅक चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. एका बाऊलमध्ये थोडी मॅश केलेली पपई, व्हिटॅमिन ई आणि थोडे गुलाबपाणी एकत्र करावे. हा फेसपॅक चेहऱ्यावर व त्वचेवर नीट लावून वाळू द्या. नंतर चेहरा धुवावा.
एका भांड्यात थोडा मध आणइ व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल घ्या. हे मिश्रण नीट एकत्र करा. आता तयार झालेली ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सपासून आराम मिळेल.
( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा )