मसूर डाळ आणि दुधाचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!
लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.
मुंबई : लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, तरीही सुंदर आणि चमकदार त्वचा मिळत नाही. आपण काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. (Lentil dal and milk face pack are beneficial for the skin)
मसूर डाळ ही फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. मसूर डाळीचा फेसपॅक आपण चेहऱ्याला लावला तर चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला फक्त मसूर डाळ लागणार आहे. चार चमचे मसूर डाळ रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी डाळीची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यात थोडे गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा.
साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, सुरकुत्या जाण्यास मदत होईल. थोडी मसूर डाळ शुद्ध तुपात भाजून घ्या. यानंतर, डाळ दुधात भिजवून घ्या आणि ही डाळ चांगली भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्या. ही पेस्ट किमान एक ते दीड तास चेहर्यावर लावा. चेहऱ्यावर फेस पॅक लावलेला असताना, कुणाशीही बोलू नका किंवा हावभाव करू नका. अन्यथा, त्वचा सैल होईल.
आपण दररोज हा फेस पॅक वापरू शकत नसाल, तर दोन ते तीन दिवसांनी पुन्हा चेहऱ्यावर प्रयोग करा. दही आणि तांदळाच्या पीठाचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी चार चमचे दही, दोन चमचे तांदळाचे बारीक केलेले पीठ आणि गुलाब पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट साधारण 30 मिनिटांसाठी आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Lentil dal and milk face pack are beneficial for the skin)