Skin Care Tips :स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी होममेड टोनर बनवा आणि निरोगी त्वचा मिळवा!

टोनर हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. टोनर जवळजवळ सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरले जाते. तेलकट त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे. ते केवळ चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यात मदत करत नाहीत तर ते साफ देखील करण्यास मदत करते.

Skin Care Tips :स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी होममेड टोनर बनवा आणि निरोगी त्वचा मिळवा!
त्वचा
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 10:53 AM

मुंबई : टोनर हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. टोनर जवळजवळ सर्व प्रकारच्या त्वचेसाठी वापरले जाते. तेलकट त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे. ते केवळ चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यात मदत करत नाहीत तर ते साफ देखील करण्यास मदत करते. (Make a homemade toner for clear and glowing skin)

ते चेहरा खोलवर स्वच्छ करण्यास आणि छिद्रांचा आकार कमी करण्यास मदत करते. तुम्ही विकत टोनर घेण्यापेक्षा घरगुती पध्दतीने देखील तयार करू शकता. आपण घरी अँटी एक्ने टोनर कसे बनवायचे हे बघणार आहोत.

कडुलिंब टोनर

यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पाने, डिस्टिल्ड वॉटर आणि स्प्रे बाटलीची आवश्यकता असेल. सर्वप्रथम, एक सॉसपॅन घ्या आणि त्यात डिस्टिल्ड वॉटर घाला. पाण्यात मूठभर ताजे, स्वच्छ कडुलिंबाची पाने घाला. पाणी हिरवे होईपर्यंत उकळवा. गॅसवरून काढून थंड होऊ द्या. चाळणीच्या मदतीने कडुलिंबाची पाने वेगळी करा आणि पाणी स्वच्छ आणि कोरड्या स्प्रे बाटलीमध्ये भरा. हे फ्रिजमध्ये ठेवा आणि दररोज चेहऱ्यावर आणि मानेवर हे होममेड अँटी एक्ने टोनर म्हणून वापरा.

ग्रीन टी आणि गुलाब पाणी टोनर

हे टोनर तयार करण्यसाठी ग्रीन टी, गुलाब पाणी आणि स्प्रे बाटल लागणार आहे. 2 चमचे ग्रीन टी पाने वापरून एक कप ग्रीन टी तयार करा. टी तयार झाल्यानंतर गॅसवरून काढून थंड होऊ द्या. त्यात अर्धा कप गुलाब पाणी घाला. चाळणीच्या मदतीने पाणी गाळून स्वच्छ आणि कोरड्या स्प्रे बाटलीत साठवा. तुमचे होममेड अँटी एक्ने टोनर आता वापरायला तयार आहे. फ्रीजमध्ये ठेवा. प्रत्येक वेळी आपण आपल्या चेहऱ्याला क्लींजर म्हणून हे वापरू शकता.

कोरफड जेल आणि अॅपल सायडर व्हिनेगर

यासाठी तुम्हाला कोरफड जेल, अॅपल सायडर व्हिनेगर, डिस्टिल्ड वॉटर आणि स्प्रे बाटलीची आवश्यकता असेल. ब्लेंडरमध्ये 2 चमचे कोरफड जेल आणि 4 चमचे डिस्टिल्ड वॉटर घाला. एकदा ब्लेंड करा. ते बाहेर काढा आणि त्यात एक चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घाला. ते एकत्र मिक्स करा आणि तुमचे होममेड अँटी एक्ने टोनर तयार आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Make a homemade toner for clear and glowing skin)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.