Health Tips : तरुण दिसण्यासाठी जीवनशैलीमध्ये ‘हे’ बदल करा, वाचा याबद्दल अधिक !
आपल्या सर्वांना तरूण दिसायला आवडते. परंतु वाढत्या वयानुसार वृद्ध होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु आजच्या खराब जीवनशैलीमुळे अकाली वृद्धत्व लोकांमध्ये दिसून येत आहे.
मुंबई : आपल्या सर्वांना तरूण दिसायला आवडते. परंतु वाढत्या वयानुसार वृद्ध होणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु आजच्या खराब जीवनशैलीमुळे अकाली वृद्धत्व लोकांमध्ये दिसून येत आहे. वृद्धत्वाची पहिली चिन्हे तुमच्या चेहऱ्यावर दिसतात. विशेषत: बारीक रेषा आणि सुरकुत्या चेहऱ्यावर दिसू लागतात. ही सर्व लक्षणे थांबवली जाऊ शकते. मात्र, यासाठी आपल्याला जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. (Make these lifestyle changes to look younger)
वेळेवर झोपणे आवश्यक
वेळेवर झोप न घेतल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. जर आपण रात्री उशीरा झोपत असाल आणि आपल्याला पुरेशी झोप मिळत नसेल तर वृद्धत्वाची चिन्हे लवकर दिसून येतात. या व्यतिरिक्त यामुळे हृदयाशी संबंधित आजार देखील होण्याची शक्यता असते.
धूम्रपान
आपल्या सर्वांना हे माहित आहे की, धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि यामुळे आपण आपल्या वयापेक्षा जास्त वयस्कर दिसतो. धूम्रपान केल्यामुळे वृद्धत्वाची चिन्हे स्पष्टपणे दिसतात. याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. हे आपल्या त्वचेच्या पेशींना खराब करते, ज्यामुळे आपण वयस्कर दिसतो.
वृद्धत्व रोखते
रेड वाईनमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात जे आपल्या त्वचेवर अँटी-एजिंग म्हणून कार्य करतात. तसेच ते त्वचेमध्ये कोलेजेन वाढवण्यास देखील मदत करतात. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत.
हेल्दी आहार न घेणे
हेल्दी आहार न घेतल्याने त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. निरोगी अन्न न खाणे आणि पुरेसा व्यायाम न केल्याने आपल्या त्वचेच्या समस्या वाढू शकतात. आपल्या आहारात फळे आणि ज्यूस घ्या. याशिवाय साखर आणि चरबीऐवजी अन्नात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा जास्त प्रमाणात समावेश करा.
आहारात बदल आवश्यक
जर खरोखरच आपण आपल्याला चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायचा प्रयत्न करत असाल, तर प्रथम आपल्या खाण्याच्या सवयीत सुधारणा करणे आवश्यक आहे. केवळ या सवयी बदलल्यानंतरच, कोणताही घरगुती उपचार आपल्या त्वचेवर प्रभावी ठरू शकतो. यासाठी बाहेरील खाद्यपदार्थ, जंकफूड आणि फास्टफूड खाणे शक्यतो टाळा.
चहाऐवजी अँटीऑक्सिडंटनी समृद्ध ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा. हे अँटीऑक्सिडंट चेहरा आणि त्वचा उजळ करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. याशिवाय हिरव्या भाज्या आणि हंगामी फळे भरपूर प्रमाणात सेवन करा. मोड आलेले कडधान्य खा आणि भरपूर पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Make these lifestyle changes to look younger)