Makeup Tips | सणांच्या दिवसात बेस्ट लूक हवाय? पण मेकअप करायला वेळ नाही ? ट्राय करा 5 भन्नाट मेकअप टिप्स
दिवाळीच्या दिवसामध्ये आपण सुंदर दिसाव असं प्रत्येकाला वाटत असते. आपला लूक इतरामपेक्षा वेगळा दिसावा याच प्रयत्नांमध्ये प्रत्येक जण असतो. पण सणांच्या गडबडीमध्ये स्वत:कडे पाहण्यासाठी कोणालाच वेळ मिळत नाही. नेहमी जरी आपण मेकअप करत नसलो तरी सणाला मात्र मेकअप केल्यास आपण उठून दिसतो. मेकअपच्या काही सोप्या टीप्स अशावेळी नक्कीच उपयोगी ठरतात.
मुंबई : दिवाळीच्या दिवसामध्ये आपण सुंदर दिसाव असं प्रत्येकाला वाटत असते. आपला लूक इतरामपेक्षा वेगळा दिसावा याच प्रयत्नांमध्ये प्रत्येक जण असतो. पण सणांच्या गडबडीमध्ये स्वत:कडे पाहण्यासाठी कोणालाच वेळ मिळत नाही. नेहमी जरी आपण मेकअप करत नसलो तरी सणाला मात्र मेकअप केल्यास आपण उठून दिसतो. मेकअपच्या काही सोप्या टीप्स अशावेळी नक्कीच उपयोगी ठरतात. त्यामुळे आपल्या सौंदर्यात तर भर पडते आणि स्वत:ला चांगल्या पद्धतीने कॅरी केल्यास आपला आत्मविश्वासही वाढतो. घरच्याघरी सहज करता येतील अशा टीप्स असल्याने तुमच्या खिशालाही फारसा भार पडणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात तुम्ही आता 10 मिनिटात तुमचा मेकअप करु शकता.
त्वचेची काळजी घ्या
दिवाळीमध्ये गुलाबी थंडीची सुरुवात होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या थंडीत त्वचा लवकर कोरडी पडते. त्यामुळे मेकअप केला तरीही चेहरा कोरडा दिसतो. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यासाठी रात्रीच्या वेळी झोपताना चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावावे. याशिवाय ऑलिव्ह ऑईलही त्वचेची आर्द्रता टीकून राहण्यास मदत होते.
डोळ्यांचा मेकअप
नॅचरल आय मेकअप करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे प्रमाणापेक्षा बाहेर कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करू नये. हा लुक करण्यासाठी काजळ पेन्सिल हलक्या हातांनी आपल्या डोळ्यांच्या खालच्या व वरच्या वॉटर लाइनवरून फिरवावी. त्यांनी डोळ्याचा आकार उठून दिसेल. त्यांनतर पापण्यांना मस्कारा लावावा. डोळ्याच्या आयलाइनरचा बारीक लाइन लावून लुक पूर्ण करावा. तसेच एखाद्या समारंभाला जायचे असेल तर ग्लिटर्स, शिमर्स आयशॅडोज् आवर्जून वापरा. बेस पेस्टल कलर ठेऊन त्याला शोभून दिसणारी गोल्डन किंवा सिल्वर ग्लिटर आय शॅडो लावा.
लिप बाम आणि लिपस्टीक
चेहरा थकल्यासारखा वाटत असेल तर लिप बामचा वापर करा. त्यामुळे चेहऱ्यावरचा थकवा कमी जाणवतो. तसेच हा लिप बाम ओठांना लावल्याने ओठ कोरडे पडले असतील तर ते चमकदार दिसतात. लिप बाम थोड्या प्रमाणात गालावर लावल्यास तुम्ही नकळत ताजेतवाने वाटता. लिपस्टीक लावतानाही तुमच्या कपड्यांना साजेशी लिपस्टीक निवडा. शक्यतो मॅचिंग होईल अशी हलकी लिपस्टीक लावा. लीप लायनर लावल्याने ओठ उठावदार दिसण्यास मदत होईल. दिवाळीला सकाळी मेकअप करत असाल तर गुलाबी किंवा आबोली अशा फिकट रंगाच्या लिपस्टीकचा वापर करा. संध्याकाळच्या वेळी थोडा गडद रंग चालू शकेल.
लिपस्टीक खूप वेळ राहण्यासाठी हा उपाय करा
लिपस्टीक खूप वेळ राहण्यासाठी अनेक जणी खूप प्रयत्न करत असतात. यावर उपाय मिळवण्यासाठी लिपस्टीक लावल्यानंतर टिश्यू पेपरच्या सहाय्याने थोडीशी लिपस्टीक पुसून घ्या आणि त्यावर पावडचा एक लेअर लावा. यामुळे लिपस्टीक खूप वेळ टिकून राहण्यास मदत होईल.
फाऊंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर
चेहऱ्यावरील रंग खुलून दिसावा यासाठी कॉम्पॅक्ट लावणे गरजेचे आहे. यातही चांगल्या कंपनीची उत्पादने वापरल्यास त्याचा त्वचेला त्रास होत नाही. तुमच्या चेहऱ्याच्या रंगाला शोभतील असे कॉम्पॅक्ट निवडा. आधी लिक्विड फाऊंडेशन लाऊन मगच कॉम्पॅक्ट वापरा. फाऊंडेशन केवळ लिक्विड म्हणून काम न करता अॅस्ट्रिन्ग्जंट, मॉस्चरायझर आणि सनस्क्रीन म्हणूनही काम करते. पण यातही मॉइश्चरायझर जास्त प्रमाणात वापरले जाते. त्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक अशा काही निवडक प्रॉडक्ट्सचा विचार करा. त्यातही ड्राय स्किनची समस्या लक्षात घेऊन योग्य ते प्रॉडक्ट खरेदी करा.
इतर बातम्या :
फटाके फोडताना, फराळ बनवताना भाजतं, चटका बसलाय का? हे घरगुती उपाय नक्की करुन पाहा
Festival Look | दिवाळीत हटके लूक हवाय? मग तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे निवडा हेअरस्टाईल