मुंबई : सुंदर चेहऱ्या मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारातून वेगवेगळ्या क्रिम वगैरे आणतो. मात्र, हे करूनही त्वचा विशेष काही चांगली होत नाही. जर आपल्याला खरोखरच सुंदर, चमकदार आणि तजेलदार त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. (Massage the skin daily with sesame oil and get beautiful skin)
विशेष म्हणजे घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ आणि पैसेही लागत नाहीत. आपण तिळाच्या तेलानी रोज मालिश करायला पाहिजे. चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ करण्यासाठी तिळाच्या तेलाची मदत होते. या तेलामुळे चेहऱ्यावरील डाग देखील निघून जातात. दररोज रात्री झोपताना तिळाच्या तेलाने मालिश करावी आणि सकाळी पाण्याने धुवावे. तिळाचे तेल हलके गरम करून, मग या तेलाने हलक्या हाताने तुमच्या स्कॅल्पला मसाज करा.
काही वेळ हे तेल केसांमध्ये असंच राहू द्या आणि मग सध्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांना आतून पोषण मिळेल. तिळाचे तेल केसांना फक्त चमकच नाहीतर त्यांना मजबूतीही देते. जर तुम्हाला केस गळण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर तिळाच्या तेलाचा वापर नक्की करून पाहा. याने केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील दूर होते.
तिळाच्या तेलाने मसाज केल्यास रक्त परिसंचलन चांगले होते. ज्यामुळे केस लवकर वाढतात. जर केस पूर्ण वाढण्याआधीच तुटत असतील तर तिळाच्या तेलाचा वापर करावा. शिवाय केसातील कोंडा देखील याने दूर होईल. तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमीन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस आणि प्रोटीन हे घटक आढळतात. केसांच्या संपूर्ण पोषणासाठी तिळाचे तेल हे खूपच फायदेशीर मानले जाते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Massage the skin daily with sesame oil and get beautiful skin)