Skin Care Tips : ‘हे’ 3 तेल मिक्स करून त्वचेला लावा आणि सुंदर त्वचा मिळवा!
सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण नेहमीच घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर होते. बाजारात मिळणारे साैंदर्य उत्पादने जास्त प्रमाणात वापरल्याने आपली त्वचा अधिक खराब होण्याची शक्यता असते.
मुंबई : सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण नेहमीच घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर होते. बाजारात मिळणारे साैंदर्य उत्पादने जास्त प्रमाणात वापरल्याने आपली त्वचा अधिक खराब होण्याची शक्यता असते. यामुळे आपले साैंदर्य उत्पादने वापरण्यापेक्षा नेहमीच घरगुती उपाय हे केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वची सुंदर आणि चमकदार होते. (Mix these 3 oils and apply on the skin and get beautiful skin)
जर तुम्हाला चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही नेरोली तेल, बदाम तेल आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून त्वचेला लावले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा चमकदार दिसण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला नेरोली तेल, बदाम तेल आणि ऑलिव्ह ऑईल एक-एक चमचा लागणार आहे. याचे चांगले मिश्रण तयार करून घ्या आणि आपल्या संपूर्ण त्वचेला लावा. शक्यतो हे मिश्रण रात्रीच्या वेळेलाच लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
बदामांमध्ये व्हिटामिन ई भरपूर प्रमाणात असते. बदाम तेल चेहऱ्यावरील काळे डाग दूर करून, रंग उजळण्यास मदत करते. दररोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. हळूहळू, आपला रंग देखील उजळेल आणि त्वचा चमकू लागेल. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं. खोबरले तेल शरीरासाठी फायदेशीर ठरतं.
खोबरेल तेल त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम आणि चांगली होते. तुमचे जर ओठ सतत उलत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा. चेहऱ्यावर मुरूम येत असले तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Mix these 3 oils and apply on the skin and get beautiful skin)