Skin care : मुरुमापासून मुक्त होण्यासाठी मशरूमचा फेसपॅक लावा, चमकदार त्वचा मिळवा!

आपण सर्वांनी मशरूमपासून बनवलेले अनेक प्रकारचे पदार्थ नक्कीच खाल्ले असतील. भाज्यांपासून पिझ्झापर्यंत अनेक प्रकारच्या चवदार खाद्यपदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Skin care : मुरुमापासून मुक्त होण्यासाठी मशरूमचा फेसपॅक लावा, चमकदार त्वचा मिळवा!
मशरूमचा फेसपॅक
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 7:02 AM

मुंबई : आपण सर्वांनी मशरूमपासून बनवलेले अनेक प्रकारचे पदार्थ नक्कीच खाल्ले असतील. भाज्यांपासून पिझ्झापर्यंत अनेक प्रकारच्या चवदार खाद्यपदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की मशरूम त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. (Mushroom face pack is beneficial for the face)

हे त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे काम करते. यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. जे त्वचेची समस्या दूर करण्यास मदत करतात. आपण ते पावडर स्वरूपात वापरू शकता. उन्हाळ्यात मशरूम त्वचा थंड करते. तसेच त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते. याशिवाय मुरुमांच्या समस्येपासून सुटका मिळते. मशरूम फेसपॅक का वापरला जातो. हे आपण बघूयात.

मशरूम पावडरचा वापर फेसपॅक बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्हाला हे कोणत्याही किराणा किंवा वैद्यकीय दुकानात सहज मिळेल. मशरूममध्ये व्हिटॅमिन बी, सेलेनियम, कॉपर आढळतात. यामुळे त्वचा चमकदार दिसते. आजकाल मशरूमचा वापर क्रीम, लोशन आणि सीरममध्ये केला जात आहे. त्याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी होतात.

साहित्य

-मशरूम पावडर – 1 टेस्पून -ओट्स – 1/3 कप -लिंबाचा रस – 2 टेस्पून -व्हिटॅमिन ई कॅप्सूल – 1

कृती

प्रथम ओट्स आणि मशरूममध्ये पाणी मिसळून पेस्ट तयार करा. मग त्यामध्ये लिंबाचा रस, व्हिटॅमिन ई कॅप्सूल चांगले मिसळा. हा फेसपॅक हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट सुमारे 15 ते 20 मिनिटे ठेवा आणि आपला चेहरा पाण्याने धुवा. यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावा. चांगले परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा वापरू शकता.

‘व्हिटामिन डी’ शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीरात ‘व्हिटामिन डी’ची कमतरता असल्यास बरेच आजार उद्भवतात. नैसर्गिकरित्या ‘व्हिटामिन डी’ आढळणाऱ्या भाज्या आणि फळे तशी कमीच आहेत. यापैकीच एक भाजी आहे मशरूम. मशरूममध्ये ‘व्हिटामिन डी’ मुबलक प्रमाणात आढळते. दररोज मशरूम खाल्ल्याने शरीराला आवश्यक तितके ‘व्हिटामिन डी’ नैसर्गिकरित्या मिळू शकते. ‘पांढरे मशरूम’ आणि ‘पोर्टेबेला मशरूम’मध्ये ‘व्हिटामिन डी’ चांगल्या प्रमाणात आढळते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Mushroom face pack is beneficial for the face)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.