Skin care : कडुलिंबाचे हे फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या लगेचच दूर करा!
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कडुलिंब (Neem) हे आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कडुलिंबाचा वापर अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. हे त्वचा आणि केसांशी (Hair) संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते.
मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कडुलिंब (Neem) हे आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कडुलिंबाचा वापर अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. हे त्वचा आणि केसांशी (Hair) संबंधित अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करते. कडुलिंबात अँटी-बॅक्टेरियल, एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे मुरुम (Pimples) आणि मुरुमांच्या खुणा काढून टाकण्याचे काम करते. तसेच पिगमेंटेशन आणि ब्लॅकहेड्स देखील साफ करण्यास मदत करते. याशिवाय एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया कडुलिंबाचा फेसपॅक कसा तयार करायचा.
काळे डाग
एक चमचा कडुलिंबाच्या पानाची पेस्ट तयार करा. त्यामध्ये दोन चमचे दही घाला, चांगले मिसळा आणि 15 ते 20 मिनिटे त्वचेवर सोडा. यानंतर स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा. दही डाग आणि काळे डाग साफ करण्याचे काम करते. कडुलिंबात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. यामुळे हा पॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दर आठ दिवसातून दोन वेळा आपण हा खास फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावायला हवा.
कडुलिंब आणि तुळस
हा फेसपॅक बनवण्यासाठी काही कडुलिंबाची पाने आणि तुळशीची पाने घ्या. या पानांची बारीक पेस्ट तयार करा. त्यात एक चमचा मध आणि मुलतानी माती घाला, चांगले मिसळा. 15 मिनिटे मानेवर आणि चेहऱ्यावर राहू द्या नंतर पाण्याने धुवा. मुलतानी माती मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून किमान दोन वेळा लावला पाहिजे.
कडुलिंब आणि हळद
हा फेसपॅक बनवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांना उकळवून त्याची पेस्ट बनवा. त्यात अर्धा चमचा हळद घाला, अर्धा चमचा खोबरेल तेल घाला. 15 मिनिटे त्वचेवर लावा, नंतर पाण्याने धुवा. त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचे काम हा फेसपॅक करतो. सध्याच्या हंगामामध्ये त्वचेसाठी हा फेसपॅक खूप जास्त फायदेशीर आहे.
गुलाब पाणी आणि कडुलिंब
कडुलिंबाची सात ते आठ पाने घ्या. त्यानंतर या पानांची बारीक पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट वीस मिनिटे तशीच ठेवा आणि नंतर आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होईल. शिवाय आपला चेहरा कोमल आणि तजेलदार होण्यासही मदत होईल.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Food : उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी काकडीच्या सूपचा आहारात समावेश करा, जाणून घ्या रेसिपी!
Health : आयुष्यातून या 3 गोष्टी कायमच्या आऊट करा आणि जीवन बघा कसे सुंदर होते!