खराब केसांवर महागड्या केराटिन ट्रीटमेंट ऐवजी घरगुती उपचारही ठरेल लाखमोलाचा!

केराटिन ट्रीटमेंटद्वारे एक्सपर्ट्स केसांमध्ये आर्टिफिशल केराटिन प्रोटीन टाकून केस खराब होण्यापासून थांबवतात आणि यामुळे आपले केस खूपच सॉफ्ट, स्मूद आणि शायनी बनतात. प्रत्येकाला ही ट्रीटमेंट करणे शक्य नसते. जर तुमचे केस सुद्धा खूप रफ,कडक झाले असतील आणि तुम्हाला सुद्धा ही ट्रीटमेंट करायची इच्छा आहे, पण पैसे नसल्यामुळे जर तुम्ही ट्रीटमेंट करू शकत नसाल, तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत...

खराब केसांवर महागड्या केराटिन ट्रीटमेंट ऐवजी घरगुती उपचारही ठरेल लाखमोलाचा!
Hair care
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 4:27 PM

हल्ली प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते. सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळी ट्रीटमेंट करू पाहतो, परंतु सुंदर बनण्याच्या नादात आपण आपले सौंदर्य देखील अनेकदा गमावून बसतो. केस गळणे, केसांत कोंडा निर्माण होणे, यासारख्या अनेक समस्या महिलांमध्ये पाहायला मिळतात. मात्र, हल्ली बाजारामध्ये केसांची ट्रीटमेंट करण्यासाठी केराटिन ट्रीटमेंट (keratin treatment) खूपच प्रसिद्ध आहे. तसे पाहायला गेले तर केराटिन एक प्रोटीन (Protein) आहे ,जे आपल्या केसांमध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असते. या केराटिन ट्रीटमेंटद्वारे एक्सपर्ट्स केसांमध्ये आर्टिफिशल केराटिन प्रोटीन टाकून केस खराब होण्यापासून थांबवतात आणि यामुळे आपले केस खूपच सॉफ्ट, स्मूद आणि शायनी बनतात. ही ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला 3 ते 5 हजार रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो. शिवाय या ट्रीटमेंटचा परिणाम सुद्धा 3 ते 4 महिने इतकाच असतो. प्रत्येकाला ही ट्रीटमेंट करणे शक्य नसते. जर तुमचे केस सुद्धा खूप रफ,कडक झाले असतील आणि तुम्हाला सुद्धा ही ट्रीटमेंट करायची ईच्छा आहे, पण पैसे नसल्यामुळे जर तुम्ही ट्रीटमेंट करू शकत नसाल, तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आम्ही तुम्हाला असा एक पर्याय सांगणार आहोत, जो केराटिन ट्रीटमेंट पेक्षा जास्त लाभदायक ठरणार आहे. तुमचे गळणारे केस व तुटणारे व खराब झालेले केस यामुळे नियंत्रणात( damage hair controler) येतील आणि तुमच्या केसांना सुद्धा नैसर्गिक रित्या चमक मिळेल.

कोणते तीन पदार्थ महत्त्वाचे?

केसांना सुंदर बनवण्यासाठी आपल्याला फक्त तीन पदार्थ लागणार आहेत. ते तीन पदार्थ म्हणजे पांढरे तांदूळ, कोरफड आणि अळशीच्या बिया. तज्ञ मंडळींच्या मते पांढऱ्या तांदळात केराटिन नसते, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन आणि खनिज यांचा समावेश असतो. जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक मानले जातात. सोबतच अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड, प्रोटीन, कार्बोहाइड्रेट यासारखे तत्व उपलब्ध असतात. त्याचबरोबर कोरफड हे आपल्या केसांसाठी व त्वचेच्या आरोग्यासाठी रामबाण औषध मानले गेलेले आहे. यामुळे आपली त्वचा व केस चमकू लागतात. या तीन पदार्थांच्या सहाय्याने केसांचा बनवलेला मास्क नक्कीच उपयुक्त ठरेल.या पदार्थांचा वापर करून आपण घरच्या घरी आपल्या केसांचे आरोग्य नैसर्गिक रित्या जपू शकतो.

कसा बनवाल हेअर मास्क?

हा हेअर मास्क बनवण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये अर्धा वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी अळशीच्या बिया टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी ओतून हे मिश्रण उकळू द्या. हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर 10 ते 15 पर्यंत मिनिटापर्यंत उकळू द्यायचे आहे. जोपर्यंत यामध्ये चिकटपणा येत नाही तोपर्यंत हे मिश्रण तसेच ठेवायचे आहे. एकदा का या मिश्रणाला चिकटपणा आल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण गाळणीच्या सहाय्याने गाळायचे आहे. यामुळे यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर आपल्याला कोरफड जेल घ्यायचा आहे. कोरफड जेल व बनवलेले मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे.

कितीवेळेस करावा प्रयोग?

आता आपल्याला या मिश्रणाला आपल्या केसांच्या मुळाशी आणि संपूर्ण केसांना लावायचे आहे. त्यानंतर अर्ध्या ते एक तासानंतर आपल्याला केस थंड पाण्यात धुवायचे आहे. हा प्रयोग आपण आठवड्यातून एकदा केला आणि महिन्यातून तीन ते चार वेळा जरी आपण व्यवस्थित रित्या केला. तर तुमच्या केसांच्या आरोग्यामध्ये फरक जाणवू लागेल. तसेच तुमचे केस गळणार नाही, केस तुटणार नाहीत आणि केसांना मजबूती सुद्धा मिळेल. म्हणून अशा प्रकारचा उपाय करून केसांचे आरोग्य नेहमी जपायला हवे.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.