Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

पोषक तत्वयुक्त ऑलिव्ह ऑईल अनेक पदार्थांची चव वाढवते. या व्यतिरिक्त, हे तेल सौंदर्य उत्पादनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ऑलिव्ह ऑईलमुळे आपल्या केस आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय ऑलिव्ह ऑईलच्या मदतीने आपण अनेक प्रकारचे फेसपॅक आणि फेसमास्क तयार करू शकतो.

Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 7:50 AM

मुंबई : पोषक तत्वयुक्त ऑलिव्ह ऑईल अनेक पदार्थांची चव वाढवते. या व्यतिरिक्त, हे तेल सौंदर्य उत्पादनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ऑलिव्ह ऑईलमुळे आपल्या केस आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. शिवाय ऑलिव्ह ऑईलच्या मदतीने आपण अनेक प्रकारचे फेसपॅक आणि फेसमास्क तयार करू शकतो. ज्याचा आपल्या त्वचेवर, केसांवर चांगला परिणाम होतो.

त्वचा आणि केस

बऱ्याच वेळा आपल्या चेहऱ्यावर आणि केसांवर रंग लागतात. अशावेळी तुम्ही ऑलिव्ह ऑईल वापरू शकता. ज्या ठिकाणी रंग लागला आहे, त्याठिकाणी साधारण पाच मिनिटांसाठी हे तेल राहूद्या आणि पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवर लागलेल्या रंग जाण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑईल आणि गुलाब तेल

एक चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये गुलाब तेलाचे काही थेंब मिसळून मिश्रण तयार करा. आपल्या बोटांनी त्वचेला हळूवारपणे मालिश करा. तुमची त्वचा शोषून घेईपर्यंत हे करा. एक तास सोडा आणि त्यानंतर ओलसर टॉवेलने पुसून टाका.

ऑलिव्ह ऑईल आणि मध फेसपॅक

हा फेसपॅक बनवण्यासाठी एक अंड्याचा लगदा, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा मध घ्या. या सर्व गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक 20 मिनिटांसाठी ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा लावला तर चेहरा चमकदार दिसण्यास मदत होते.

केसांची वाढ

ऑलिव्ह ऑईलने टाळूची मालिश केल्याने केस मऊ आणि मजबूत होतात. हे तुमचे केस पातळ होण्यापासून वाचवते आणि फ्रिजपासून सुटका देखील करते. ऑलिव्ह तेल हलके गरम केल्यानंतर लावा आणि सुमारे 2 ते अडीच तासांनी सौम्य शॅम्पूने धुवा. हे केवळ आपल्या केसांची वाढ वाढवण्यास मदत करत नाही तर केस चमकदार आणि मऊ ठेवण्यास देखील मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Olive Oil is extremely beneficial for the skin)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.