त्वचा उजळण्यासाठी संत्र्याच्या सालीचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

आपण फळे खाल्लानंतर फळांची साल फेकून देतो. परंतु आपल्याला माहिती आहे का याच फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क तयार होऊ शकतात.

त्वचा उजळण्यासाठी संत्र्याच्या सालीचा करा वापर, मिळतील अनेक फायदे
संत्र्याचे साल
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 8:48 AM

मुंबई : आपण फळे खाल्लानंतर फळांची साल फेकून देतो. परंतु आपल्याला माहिती आहे का याच फळांच्या सालीपासून विविध फेस मास्क तयार होऊ शकतात. आणि हे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत चांगले आहे याच्यापुढे महागडे फेशियल आणि ब्रँडेड क्रीमही अपयशी ठरू शकतात. त्यातील पोषक घटक आपली त्वचा निरोगी बनवते आणि चेहर्‍यावर नैसर्गिक चमक देखील येते. (Orange peel is beneficial for the skin)

-संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोडया हलक्या हातांनी मसाज करा, कारण फेसमास्कबरोबरच हे चांगले स्क्रब आहे. मसाज केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.

-त्वचा तेलकट असल्यास एका वाटीमध्ये संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि चंदन पावडर एकत्र घ्या व फेस पॅक तयार करा. या पॅकमुळे तेलकट त्वचेवरील मुरुमांची समस्या हळूहळू दूर होण्यास मदत मिळू शकते

-संत्र्याची ताजी साल आपण आपल्या कोपर, गुडघे आणि मानेवर रगडू शकता. यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त संत्र्याच्या सालीची पेस्ट तयार करून त्यामध्ये मध मिक्स करा व हे मिश्रण आपल्या त्वचेवर लावा.

-यामुळे त्वचेवरील मृत पेशींची समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि त्वचेवरील रोमछिद्रांची खोलवर स्वच्छता होते.

-त्वचेवर नैसर्गिक तेज येईल आणि त्वचा सैल देखील पडणार नाही. तसंच मुरुम आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील दूर होण्यास मदत मिळू शकते.

-संत्र्याच्या सालीमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ची मात्रा भरपूर असते. यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, नैसर्गिक स्वरुपात तेलाचा होणारा अतिरिक्त स्त्राव नियंत्रणात आणण्याचे गुणधर्म, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल यासह अनेक गुणधर्म आहेत .

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)

संबंधित बातम्या :

(Orange peel is beneficial for the skin)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.