Skin Care : पपई आणि मधाचा फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि पिंपल्सची समस्या दूर करा!
आपल्या प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. काहींची त्वचा तेलकट आहे आणि काहींची कोरडी त्वचा आहे. जर, आपली त्वचा देखील कोरडी असेल, तर याचा अर्थ असा की, आपल्याला आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
मुंबई : आपल्या प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. काहींची त्वचा तेलकट आहे आणि काहींची कोरडी त्वचा आहे. जर, आपली त्वचा देखील कोरडी असेल, तर याचा अर्थ असा की, आपल्याला त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये पिंपल्सची समस्या जवळपास सर्वच प्रकारच्या त्वचेवर असते. एकदा जर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्य येण्यास सुरूवात झाली की, आपला चेहरा दिवसेंदिवस खराबच होत जातो. (Papaya and honey face pack is beneficial for the skin)
चेहऱ्यावरील पिंपल्यची समस्या कायमची दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी पपई आणि मधाचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक लावल्याने पिंपल्सची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचे डागही दूर होण्यास मदत होते. ही पेस्ट घरी तयार करण्यासाठी पपईचा गर घ्या आणि त्यामध्ये मध मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.
ही पेस्ट आपण आठ दिवसातून चार ते पाच वेळा लावली पाहिजे. किमान 30 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. हे मिश्रण लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमं बरे होतील. तसेच, आपली त्वचा देखील मुलायम दिसेल. निरोगी आणि चमकणारी त्वचेसाठी, एक चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे मध मिसळा. मध आपली त्वचा मॉइश्चराइझ करते. लिंबू त्वचेचे डाग आणि चेहरा स्वच्छ करतो. लिंबाचा रस, मध आणि साखर मिसळून आपण घरच्या घरी स्क्रब तयार करू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल. एक चमचा मधात लिंबाचा रस मिसळा आणि मास्क सारख्ये चेहऱ्यावर लावा.
कोरफड जेलमध्ये थोडीशी साखर आणि लिंबाचा रस मिसळून त्याचा स्क्रब तयार करू शकता. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्कीन तर काढतोच आणि त्वचेलाही हायड्रेट ही करतो. यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते. याशिवाय कोरफडाच्या रसात थोडेसे नारळाच्या तेलाचे थेंब घालून ते गुडघे, टाचा आणि हाताच्या कोपराला लावल्यास काळेपणा दूर होतो. ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते.कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
संबंधित बातम्या :
Hair Care | गर्भावस्थेदरम्यान केसांची काळजी कशी घ्यावी? वाचा ‘या’ खास टिप्स…
Raisins | दररोज प्या मनुक्याचे पाणी, शरीराला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Papaya and honey face pack is beneficial for the skin)