Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी तांदळाच्या पीठाचा फेसपॅक फायदेशीर!

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेवरील घाण कमी करण्यासाठी तांदळाचे पीठ अत्यंत आवश्यक आहे. तांदळाचे पीठ त्वचेच्या काळजीसाठी खूप फायदेशीर आहे. तांदळाच्या पिठामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फॉलिक अॅसिड असतात.हे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी तांदळाच्या पीठाचा फेसपॅक फायदेशीर!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 7:53 AM

मुंबई : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्वचेवरील घाण कमी करण्यासाठी तांदळाचे पीठ अत्यंत आवश्यक आहे. तांदळाचे पीठ त्वचेच्या काळजीसाठी खूप फायदेशीर आहे. वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यासाठी आपण याचा वापर करू शकता. (Rice flour face pack is beneficial to eliminate the problem of wrinkles on the face)

तांदळाच्या पिठामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फॉलिक अॅसिड असतात.हे सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. हे आपल्या त्वचेचे छिद्र बंद करण्यास मदत करते. आपण त्वचेतून तेल काढून टाकण्यासाठी याचा वापर करू शकता. मुरुम आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. तुम्ही तांदळाच्या पिठाचा फेसपॅक कसा वापरू शकता हे आपण बघणार आहोत.

1. अँटी एक्ने मास्क

सामग्री

2 चमचे तांदळाचे पीठ

1 टीस्पून कडुलिंबाची पेस्ट

1 टीस्पून कोरफड पेस्ट

एक चिमूटभर हळद

कसे तयार करायचे

एका वाडग्यात सर्व साहित्य चांगले मिसळा.

ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि किमान 5 मिनिटे मसाज करा.

यानंतर पेस्ट सुमारे 15 ते 20 मिनिटे सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.

2. निस्तेज त्वचेसाठी

सामग्री

2 चमचे तांदळाचे पीठ

2 चमचे टोमॅटोचा रस

1 टीस्पून कोरफड जेल

कसे तयार करायचे

टोमॅटो धुवून त्याचे दोन भाग करा.

टोमॅटो मिक्सरमध्ये ठेवा आणि प्युरी काढा.

एका वाडग्यात सर्व साहित्य चांगले मिसळा आणि पेस्ट तयार करा.

ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. ही पेस्ट 20 मिनिटे ठेवा आणि पाण्याने धुवा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा.

3. अँटी एजिंग मास्क

सामग्री

2 चमचे तांदळाचे पीठ

1 टीस्पून नारळाचे पाणी

1 टिस्पून मॅश केलेले केळी

कसे तयार करायचे

सर्व साहित्य एका वाडग्यात ठेवा आणि चांगले मिक्स करा.

हा फेस मास्क तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा.

कमीतकमी 5 मिनिटे मालिश करा आणि कोरडे झाल्यानंतर 20 मिनिटे ठेवा.

नंतर कोमट पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Rice flour face pack is beneficial to eliminate the problem of wrinkles on the face)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.