Rosacea : पावसाळ्यात त्वचेला संसर्ग झाला? ‘हा’ आहे त्याचा आयुर्वेदिक उपचार!
पावसाळा सुरू झाल्यावर त्वचेच्या समस्या सामान्य आहेत. त्वचेवर पुरळ येणे, चट्टे येणे, खास सुटणे अशा एक ना अनेक समस्या पावसाळ्याच्या दिवसात त्वचेसंदर्भात समोर येतात. या समस्येवर काही आयुर्वेदिक उपचार खूप फायदेशीर ठरू शकतात.
दिल्लीत काही काळासाठी हवामानातील आर्द्रता 60 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवसांच्या कडक उन्हानंतर गेल्या आठवड्यात राज्यभरात पाऊस झाला. हवामानातील अशा बदलांमुळे त्वचेच्या समस्या (Skin problems) उद्भवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आणि रोसेसियासारख्या समस्याही वाढतात. रोसासियाचा प्रभाव (Influence of rosacea) गालावर, कपाळावर आणि हनुवटीवर सर्वाधिक दिसून येतो. रोसासिया या समस्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु असे मानले जाते की ते अतिक्रियाशील रोगप्रतिकारक (immune system) शक्तीमुळे असू शकते. लोक सहसा रोसासियाला मुरुम, त्वचेशी संबंधित इतर समस्या किंवा त्वचेच्या कोरडेपणाशी जोडतात. परंतु जर रोसासियावर वेळेवर उपचार केले गेले नाहीत. तर, त्वचेवर उद्भवणारा लालसरपणा आणि सूज अधिक वाढू शकते आणि कायमचा चेहरा खराब होऊ शकतो.
हार्मोनल बदलांमुळे संसर्ग होतो
आयुर्वेदातील वरिष्ठ सल्लागार आणि मेदांता येथील एकात्मिक औषध विभागाचे प्रमुख डॉ. जी. गीता कृष्णन यांनी Tv9 ला सांगितले की, रोसासिया हे शरीरातील हार्मोनल बदलांचे लक्षण देखील असू शकते, ज्यामुळे शरीरात चयापचय किंवा उष्णता वाढते. ते म्हणाले की आयुर्वेदानुसार, ही पित्त प्रकृती असलेल्या व्यक्तींमध्ये उद्भवणारी ‘पित्त’ आधारित स्थिती आहे. पित्त दोष हा आयुर्वेदात अग्नि आणि पाण्यावर आधारित मानला जातो. ही प्रवृत्ती सामान्यतः उष्ण, हलकी, वेगवान, तेलकट, द्रव आणि स्थिर नसलेली अशी असते. असे दिसून आले आहे की, पित्ताची प्रवृत्ती असलेले लोक बहुतेक वेळा काटक शरीर यष्टीचे असतात.
आयुर्वेदिक उपचार काय आहे
रोसासिया झाल्यास अंजीर, कढीपत्ता ताक इत्यादींचे सेवन करावे असे डॉ कृष्णन यांनी सांगितले. ते म्हणाले की, रोससिया झाल्यास बाधित भाग स्वच्छ करण्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि गुलाबपाणी लावावे. त्यामुळे लवकर आराम मिळतो. तसेच मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे. या परिस्थितीत मासे आणि तीळ टाळणे देखील चांगले आहे. यासोबतच डॉ. कृष्णन यांनी रोससियाचा त्रास असलेल्या लोकांना रात्री चांगली झोप घेण्याचा आणि अनुलोम विलोमसारखे श्वासोच्छवासाचे व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.