चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी गुलाब पाकळ्या आणि दालचिनीचा फेसपॅक फायदेशीर!

सध्याची बदलेली जीवनशैली, वाढते वय, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्याची तसेच सौंदर्याचीही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होते.

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी गुलाब पाकळ्या आणि दालचिनीचा फेसपॅक फायदेशीर!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 5:26 PM

मुंबई : सध्याची बदलेली जीवनशैली, वाढते वय, खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी यामुळे आरोग्याची तसेच सौंदर्याचीही समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत. त्वचेची काळजी नीट घेत नसल्यामुळे त्वचेसंबंधीत अनेक समस्यां उद्भवतात. आपली निरोगी आणि स्वच्छ त्वचा ही खरी सुंदरता आहे. परंतु वाढते वय आणि काही चुकीच्या सवयींमुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्याची समस्या सुरू होते. (Rose petals and cinnamon face pack are beneficial for reducing wrinkles on the face)

दालचिनी त्वचेवरील सुरकुत्या काढण्याचे काम करते. तसेच गुलाबाच्या पाकळ्या देखील आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन सी आणि ई असते जे त्वचेचा दाह कमी करण्यास आणि सुधारण्यास मदत करतात. दालचिनी आणि गुलाबाच्या पाकळ्याचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दालचिनीची पावडर, दोन चमचे गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी लागणार आहे. सर्वात प्रथम दालचिनी आणि गुलाब पाकळ्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करा.

ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्या चेहऱ्यावर लावला पाहिजे. यामुळे सुरकुत्यांची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते. ऑलिव ऑईल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईलचा वापर करून आपण सुरकुत्यापासून मुक्त होऊ शकता. दररोज झोपायच्या आधी आपल्या हातांना देखील ऑलिव्ह ऑईलने मालिश करा.

सकाळी उठून कोमट पाण्याने आपले हात आणि चेहरा धुवा. लिंबामध्ये व्हिटामिन सी प्रमाणात अधिक असते. व्हिटामिन सी युक्त अन्न खाल्ल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. जेव्हा चेहऱ्यावर किंवा हातांवर सुरकुत्या दिसू लागतील तेव्हा आपण लिंबू आणि ब्राऊन शुगरचा स्क्रब वापरू शकता. यासाठी एका भांड्यात एका लिंबाचा रस घ्या आणि त्यात अर्धा चमचा ब्राऊन शुगर टाकून त्याचा स्क्रब बनवा. हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Rose petals and cinnamon face pack are beneficial for reducing wrinkles on the face)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.