चेहऱ्यावरील काळे डाग-पिंपल्स ‘या’ समस्येवर गुणकारी ग्रीन टी, गुलाब पाणी आणि चंदनचा फेसपॅक!
ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहीती आहे. मात्र, ग्रीन टी हे फक्त आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
मुंबई : ग्रीन टी पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे आपल्या सर्वांनाच माहीती आहे. मात्र, ग्रीन टी हे फक्त आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. आपण घरच्या घरी ग्रीन टीचा फेसपॅक तयार करून चमकदार आणि सुंदर त्वचा मिळू शकतो. विशेष म्हणजे हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य आणि वेळही लागत नाही. (Rose water and sandalwood face pack are beneficial for removing dark spots and pimples on the face)
चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स, सुरकुत्या आणि मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी ग्रीन टी, गुलाब पाणी आणि चंदन पावडरचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला तीन चमचे थंड झालेली ग्रीन टी, दोन चमचे गुलाब पाणी आणि चार चमचे चंदन पावडर लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा.
हा फेसपॅक आपण दर आठ दिवसातून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. जर, आपली त्वचा तेलकट असेल, तर तांदळाचे पीठ आणि ग्रीन टीचा फेस पॅक आपल्या त्वचेसाठी खूप चांगला ठरेल. हा फेस पॅक बनवण्यासाठी एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा ग्रीन टी आणि 2 चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्याची पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट आपल्या चेहऱ्यावर किमान 15 मिनिटे लावून ठेवा. नंतर पाण्याने चेहरा धुवा.
ग्रीन टी-पुदीना फेस पॅक या हंगामात चेहऱ्याला प्रचंड आराम देतो. पुदीन्यामुळे, चेहऱ्याला थंडावा आणि ताजेपणा येतो, तर त्वचा देखील घट्ट होते. हा फेस पॅक तयार करण्यासाठी, 2 चमचे पुदीन्याच्या पानांचा रस, 1 चमचा मध आणि 3 चमचे ग्रीन टीची पाने बारीक वाटून घ्या. ही पेस्ट चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून किमान 20 मिनिटांसाठी लावा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा तरी हा फेस पॅक वापरावा.
संबंधित बातम्या :
Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Rose water and sandalwood face pack are beneficial for removing dark spots and pimples on the face)