Saffron DIY Mask : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी केशरचे ‘हे’ 3 फेसपॅक चेहऱ्याला लावा

केसर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे. स्वयंपाकघरातील केसरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी आणि त्वचा सुंदर करण्यासाठी केला जातो.

Saffron DIY Mask : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी केशरचे 'हे' 3 फेसपॅक चेहऱ्याला लावा
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:32 AM

मुंबई : केशर हे अनेक गुणांनी समृद्ध आहे आणि त्याला खूप महत्त्व देखील आहे. स्वयंपाक घरात केशरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. केशरचा उपयोग शतकानुशतके खाण्याची चव वाढवण्यासाठी आणि त्वचा सुंदर करण्यासाठी केला जातो. आपण त्वच्या सुंदर करण्यासाठी साैदर्य उत्पादने वापरण्यापेक्षा त्वचेसाठी केशर वापरले पाहिजे. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. (Saffron is extremely beneficial for the skin)

1. मुरुम

साहित्य

केशर दोन चमचे

3 चमचा एलोवेरा जेल

अर्धा चमचा हळद

प्रक्रिया :

केशर चांगले बारीक करून घ्या आणि त्यामध्ये 3 चमचा एलोवेरा जेल, अर्धा चमचा हळद मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर चेहऱ्याची मालिश करा. 20 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

2. पिगमेंटेशन

साहित्य

1 चमचा केशर

3 चमचे पपईचा लगदा

1 चमचा दही

प्रक्रिया :

वरील सर्व गोष्टी मिसळून जाड पेस्ट तयार करा. हे मिश्रण क्लीन्सर म्हणून चेहरा आणि मानेवर लावा. त्यानंतर पेस्ट कोरडी होईपर्यंत तशीच ठेवा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा.

3. कोरडी त्वचा

साहित्य

केशर अर्धा चमचा

3 चमचा मॅश केलेले केळी

एक चमचा दूध

प्रक्रिया :

एका भांड्यात केशर आणि इतर गोष्टी मिसळून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

केशर आणि दुधाचा फेसपॅक त्वचेचा रंग उजळवण्यासाठी केशर आणि दुधाचा फेसपॅक लावा. यासाठी तुम्हाला थोडे केशर रात्रभर भिजवावे लागेल आणि त्यामध्ये दुध मिसळा त्यानंतर सकाळी ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. 20 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

(टीप : कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Saffron is extremely beneficial for the skin)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.