चंदन पावडर आणि दह्याचा फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!
आपली चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि हेल्दी दिसावी असे आपल्या प्रत्येकालाच वाटत असते. त्वचा सुंदर होण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो.
मुंबई : आपली चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि हेल्दी दिसावी असे आपल्या प्रत्येकालाच वाटत असते. त्वचा सुंदर होण्यासाठी आपण सर्व प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतो. याचा एक प्रयोग फार जुन्या काळापासून चालू आहे आणि तो म्हणजे चंदन. अनेक वर्षांपासून लोक चंदनचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे चंदन हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. (Sandalwood powder and curd face pack are beneficial for the skin)
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण दररोज घरच्या घरी चंदन पावडर आणि दह्याचा फेसपॅक तयार करून शकतो. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि त्यात अर्धा चमचा दही मिसळा. हे दोन्ही घटक व्यवस्थित मिसळा आणि फेसपॅक प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक दहा मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सर्व घाण दूर होईल.
चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेल फायदेशीर आहे. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं. ब्लॅकहेड्सची समस्याही दूर होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी बदामाचे तेल, बदाम पेस्ट किंवा बदामाचे दुधाचा वापर आपण करू शकता. यासाठी काही बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भिजलेले बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून पेस्ट घ्या आणि चेहऱ्याला लावा.
सर्व प्रथम एका भांड्यात 1 चमचे चंदन पावडर घ्या. त्यात 2 चमचे पाणी घाला. दोन्ही गोष्टी चांगल्या मिसळा. चंदन पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने त्वचा थंड होते आणि चेहर्यावरील डाग कमी होतात. चंदनामुळे चेहऱ्याचा टोन सुधारण्यास मदत होते. यामुळे आपण आठ दिवसामधून एकदा तरी हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावला पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Sandalwood powder and curd face pack are beneficial for the skin)