तुळस, शिकेकाई आणि आवळ्याचा ‘हा’ हेअर पॅक तयार करा आणि केस गळतीची समस्या दूर करा!
सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे.
मुंबई : सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण आपल्या नियमित सवयींमुळे केस गळतीचे प्रमाणात वाढते. या सवयींमध्ये बदल केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला काही घरगुती उपाय करावे लागतील. (Shikkai and Amla hair packs are beneficial for hair)
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी तुळस, शिककाई आणि आवळ्याचा हेअर पॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा हेअर पॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला तुळशीच्या पानांची पेस्ट, शिककाई दोन चमचे आणि आवळ्याचे पावडर तीन चमचे लागणार आहे. याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि शेवटी यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण केसांवर टाळूसह लावा. साधारण तीस निमिटे हा पॅक आपल्या केसांवर राहूद्या आणि नंतर केस कोमट पाण्याने धुवा.
हा पॅक आपण आठ दिवसातून तीन वेळा लावला तर आपली केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल. तुळशीची मुळे एंड्रोजेनिक अलोपिसियाच्या उपचारात मदत करू शकते. त्यात उपस्थित एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म टाळूच्या समस्या आणि इतर संक्रमणांवर उपचार करण्यास मदत करतात. हे केस मजबूत करते आणि केस तोडण्यास देखील प्रतिबंधित करते. हे रक्त परिसंचरण सुधारते. हे केसांच्या वाढीस मदत करते. शिकाकाई हे अनेक वर्षांपासून केस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते.
शिकाकाई पावडर आणि कोमट पाण्याने बनवलेल्या पेस्टसह टाळूची मालिश केल्याने केस वाढण्यास मदत होते. हे केस मजबूत बनविण्यात मदत करते. हे टाळूचे आरोग्य सुधारते. आवळा जीवनसत्व सी समृद्ध आहे. हे कोलेजन उत्पादन वाढवते. हे केस मजबूत आणि वाढण्यास मदत करते. यामुळे आपण आवळा आपल्या केसांना जास्तीत-जास्त वापरला पाहिजेत. केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Shikkai and Amla hair packs are beneficial for hair)