उन्हाळ्यातील पुरळांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये घामामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. तसेच घामामुळे पिंपल्सही (Pimples) येण्याची समस्या अधिक होते. बहुतेक लोकांना पाठीवर किंवा मानेवर उष्णतेमुळे पुरळ (घामोळ्या) येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे खाज आणि जळजळ होते. कधीकधी लहान जखमा देखील होतात.
मुंबई : उन्हाळ्याच्या (Summer) हंगामामध्ये घामामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. तसेच घामामुळे पिंपल्सही (Pimples) येण्याची समस्या अधिक होते. बहुतेक लोकांना पाठीवर किंवा मानेवर उष्णतेमुळे पुरळ (घामोळ्या) येण्याची समस्या निर्माण होते. यामुळे खाज आणि जळजळ होते. कधीकधी लहान जखमा देखील होतात. तसेच ही उष्णतेची पुरळ घालवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रिम आणि पावडर ही बाजारामध्ये (Market) मोठ्या प्रमाणात मिळतात. मात्र म्हणावे तसे रिझल्ट मिळत नाहीत. आज आम्ही तुम्हाला या घामोळ्यांची समस्या कायमची दूर करण्यासाठी काही घरगुती खास उपाय सांगणार आहोत.
काकडी
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये काकडी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, उष्णतेची पुरळ घालवण्यासाठीही काकडी खूप फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला काकडीचे पातळ काप करून काही वेळ फ्रीजमध्ये ठेवावे लागेल. ते थंड झाल्यावर पुरळवर ठेवा आणि हलक्या हाताने चोळा. दिवसातून दोन ते तीन वेळा हा केल्याने नक्कीच फायदा होईल.
मुलतानी माती
मुलतानी माती त्वचेच्या सर्वच समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. विशेष म्हणजे उष्णतेची पुरळ देखील मुलतानी माती दूर करते. मुलतानी मातीमुळे उष्णतेमुळे होणारी खाज आणि जळजळही शांत होते. यासाठी गुलाब पाण्यात मुलतानी माती मिसळा आणि ही पेस्ट लावा, सुकल्यावर पाण्याने धुवा.
कोरफड
कोरफड जेल त्वचेला थंडपणा प्रदान करते आणि जळजळ शांत करते. कोरफड जेल दररोज रात्री झोपण्याच्या वेळी प्रभावित भागावर लावल्यास खूप आराम मिळतो. आपण ते फ्रीजमध्ये देखील ठेऊ शकतो आणि थंड झाल्यावर लावा. पुरळवर लावू शकतो. यामुळे पुरळवरील जळजळ कमी होण्यास मदत होते.
खोबरेल तेल
खोबरेल तेल केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेच्या अनेक समस्या खोबरेल तेल दूर करते. खोबरेल तेलामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे ते उष्णतेची समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्रभावित भागावर खोबरेल तेल लावा. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Health Care Tips : वाचा उष्माघात होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय डाॅक्टरांकडूनच!