असे तयार करा ‘होम मेड फेसवॉश’, त्वचेच्या सर्व समस्या होतील दूर
अनेकदा चेहरा धुण्यासाठी कृत्रिम पध्दतीने रसायनांचा वापर करुन फेसवॉश तयार केले जात असते. परंतु यातून त्वचेला हानी पोहचण्याचा धोका निर्माण झालेला असतो. त्यामुळे अशा वेळी घरगुती पध्दतीने बनवलेला फेसवॉश परिणामकारक ठरत असतो.
वाढते प्रदूषण, धुळ, माती, उन्ह आदींचा दुष्परिणाम त्वचेवर होत असतो. सध्या उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे उन्हामुळे त्वचा कालवंडते. त्यामुळे अनेकांकडून या दिवसांमध्ये त्वचेची अधिक काळजी (Skin care) घेतली जात असते. परंतु असे करीत असताना आपण त्वचेसाठी काय वापरतोय, याला अधिक महत्व असते. अनेक जण कृत्रिम फेसवॉशसारखे प्रोडक्ट वापरत असतात. परंतु यातून त्वचेवर दुष्परिणाम होण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरात असलेल्या वस्तूंचा वापर फेसवॉश (facewas) म्हणून करू शकता. त्यांचा फायदा असा आहे की त्यांचे कोणतेही दुष्परिणाम (side effect) होत नाहीत आणि खर्चही जास्त नाही. या लेखात आपण असेच काही घटक पाहणार आहोत, ज्यांच्या वापरातून तुम्ही घरगुती पध्दतीने फेसवॉश तयार करु शकतात.
बाहेरील प्रोडक्ट टाळा
चेहरा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी, दिवसातून किमान दोनदा तो पाण्याने स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. त्यावर साचलेली घाण नुसत्या पाण्याने काढून टाकणे सोपे नाही आणि त्यामुळे फेसवॉशचा वापर हा सर्वोत्तम मार्ग आहे. तसेच, चेहऱ्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे महागडे आणि प्रभावी फेसवॉश उपलब्ध आहेत. परंतु ते अनेक प्रकारच्या रसायनांपासून बनविलेले असतात आणि कधीकधी ते यामुळे हानिकारक ठरतात. त्यामुळे शक्यतो, बाहेरील प्रोडक्ट वापरणे टाळले पाहिजे.
दूधाचा वापर करा
त्वचेसाठी फार आधीपासून दुधाचा वापर होत आला आहे. त्वचेची काळजी घेण्याच्या दृष्टीने याला ‘क्लिंजर’ असेही म्हणतात. यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेतील मृत पेशी काढून टाकून ती चमकण्यास मदत करते. वाढत्या प्रदूषणामुळे आणि चुकीच्या आहारामुळे कोरडी आणि निर्जीव त्वचा दुरुस्त करण्यासाठी तुम्ही दुधाची मदत घेऊ शकता. यासाठी एका भांड्यात 4 ते 5 चमचे दूध घ्या आणि त्यात एक चमचा मध घाला. आता चेहऱ्यावर मसाज करा. काही वेळाने धून टाकावे.
मधापासून फेसवॉश
मधाचा वापर करुन तयार केलेला होममेड फेसवॉश त्वचेला जास्त काळ हायड्रेट ठेवू शकतो. वास्तविक, त्वचेमध्ये कोरडेपणा असल्यास, त्यावर मुरुम, आणि इतर समस्या निर्माण होऊ लागतात. अशा स्थितीत त्याचा ओलावा टिकवून ठेवणे अत्यंत गरजेचे असते. प्रथम चेहरा पाण्याने ओला करा, नंतर एक चमचा मध चेहऱ्यावर लावा. आता हलक्या हातांनी मसाज करा. आता चेहरा धुवा. असे केल्याने चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्सशिवाय सुरकुत्याची समस्याही दूर होईल.
बेसन आणि लिंबू
तेलकट त्वचेवर मुरुम येण्याची समस्या सामान्य आहेत. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढण्यासाठी तुम्ही लिंबूचा वापर करु शकतात. त्याचबरोबर साचलेली घाण बेसनातून काढता येते. यासाठी एक छोटा चमचा लिंबूचा रस घ्या आणि त्यात दोन चमचे बेसन मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. या होममेड फेसवॉशला तुम्ही फेसस्क्रब असेही म्हणू शकता. यातून त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच मृतपेशीही निघून जातात.
संबंधित बातम्या :
उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा… पोटाच्या समस्यांपासून दूर रहा