त्वचेवर सुरकुत्या येत आहेत? वृद्धत्वाकडे झुकत असल्याचं जाणवतंय? मग या खास टिप्स फाॅलो करा
बरेच लोक त्वचा सुंदर आणि तजेलदार करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेसपॅक चेहऱ्यासाठी वापरतात. मात्र, याची अजिबात गरज नाहीये. आपण फक्त फळांच्या साली आणि काही घरगुती गोष्टींच्या मदतीने फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावले तरीही आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. आपण जितके अधिक क्रीम आणि रसायने टाळू शकता तितके चांगले.
मुंबई : प्रत्येकाला आपले वय 20 च्या आसपास असायला आवडते. कारण या वयामध्ये आपली त्वचा (Skin) एकदम तरूण आणि तजेलदार दिसते. शिवाय आपण एकदम फिट असतो. आहार आणि व्यायामाच्या मदतीने देखील आपण 20 वर्षांच्या मुला-मुलींसारखे दिसू शकतो. मात्र, यासाठी आपल्याला व्यायाम आणि आहार व्यवस्थित घेणे अत्यंत महत्वाचे आहे. काही लोक असे आहेत जे म्हातारपणापासून चेहरा लपवण्यासाठी खूप पैसे खर्च करतात. मात्र, हे करूनही म्हणावी तशी सुंदर त्वचा मिळतच नाही. केमिकल्सच्या (Chemicals) अतिवापरामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. यामुळेच नेहमी लक्षात ठेवा की, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण घरगुती उपाय आणि काही चांगल्या सवयी फाॅलो करून त्वचा आणि शरीर निरोगी मिळू शकतो. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला आरोग्य आणि त्वचेसाठी लक्ष देण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. परिणामी त्वचा आणि शरीर दोन्ही हेल्दी (Healthy) राहत नाही. यासाठी आपण त्वचेची आणि शरीराची नेहमीच काळजी घेतली पाहिजे.
झोप
निरोगी राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये काही महत्वाचे बदल करणे आवश्यक आहे. जर तुम्ही कमी झोप घेत असाल तर त्याचा वाईट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे एक गोष्ट नेहमीसाठीच लक्षात ठेवा की, जर तुम्ही मानसिकदृष्ट्या चांगले असाल, चांगला आहार आणि झोप चांगली असेल तर त्वचा पण चांगली राहील. यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज पडणार नाही.
फेसपॅक
बरेच लोक त्वचा सुंदर आणि तजेलदार करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेसपॅक चेहऱ्यासाठी वापरतात. मात्र, याची अजिबात गरज नाहीये. आपण फक्त फळांच्या साली आणि काही घरगुती गोष्टींच्या मदतीने फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावले तरीही आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. आपण जितके अधिक क्रीम आणि रसायने टाळू शकता तितके चांगले. फळांमधील अँटिऑक्सिडंट्स त्वचेसाठीही चांगले काम करतात. यामुळेच नेहमी फळांचे फेसपॅक चेहऱ्यासाठी वापरा.
त्वचा
आपल्या त्वचेला बाहेरून कितीही साबण, फेसवाॅश आणि वेगवेगळ्या महागड्या क्रिम वगैरे लावल्या तरीही विशेष काही परिणाम होत नाही. जर खरोखरच त्वचा सुंदर हवी असेल तर आपण पौष्टिक अन्न खावे. अन्नामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्वचा आतून निरोगी असेल तरच ती सुंदर दिसते. त्वचा नेहमीच हायड्रेटेड ठेवण्यासाठी प्रयत्न करा.