Skin | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेसाठी या टिप्स फाॅलो करा आणि बदल बघा!
या समस्या (Problem) दूर करण्यासाठी आपण नेहमीच बाजारातील उत्पादने वापरतो. मात्र, असे न करताना आपण काही घरगुती टिप्स फाॅलो करायला हव्यात. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप (Makeup) काढणे आवश्यक आहे. खरं तर त्वचा दुरुस्ती ही रात्रीच्या वेळीच होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेसंदर्भात काही गोष्टी करणे खूप जास्त महत्वाचे आहे.
मुंबई : आज प्रत्येकजण केस आणि त्वचेच्या (Skin) अनेक समस्यांना सामोरे जात आहे. बदलत्या वातावरणामध्ये केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या हंगामामध्ये विशेष करून कोरड्या त्वचेची समस्या अधिक निर्माण होते. या समस्या (Problem) दूर करण्यासाठी आपण नेहमीच बाजारातील उत्पादने वापरतो. मात्र, असे न करताना आपण काही घरगुती टिप्स फाॅलो करायला हव्यात. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप (Makeup) काढणे आवश्यक आहे. खरं तर त्वचा दुरुस्ती ही रात्रीच्या वेळीच होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेसंदर्भात काही गोष्टी करणे खूप जास्त महत्वाचे आहे.
त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत
एक्सफोलिएशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी आणि खोल साफ करण्यासाठी एक्सफोलिएशन आवश्यक आहे. तुम्ही आठवड्यातून दोनदा फेस स्क्रब वापरू शकता. तेलकट त्वचेसाठी चांगल्या दर्जाचे टोनर आवश्यक आहे. त्वचेची पीएच पातळी चांगली ठेवण्यासाठी टोनर वापरा. एक्सफोलिएशन केल्यानंतर, त्वचेवर काही घाण राहते, ते काढण्यासाठी टोनर वापरला जातो.
त्वचा ताजी ठेवण्यासाठी हे करणे महत्वाचे
दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेवर बदामाचे तेल लावून झोपा. यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. त्वचा मॉइश्चराइज्ड असणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझर त्वचा ताजे ठेवण्यास मदत करते. ते निरोगी होण्यासाठी तुम्हाला दररोज मॉइश्चरायझर वापरण्याची गरज आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही सीरम वापरू शकता. कोरडेपणा, अकाली वृद्धत्व या समस्या यामुळे दूर होण्यास मदत होते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)