Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

आठवड्यात कमीत कमी पाच दिवस 20-30 मिनिटं चालावं. यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. यामुळे तुमची त्वचा उजळेल.

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, 'या' घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 3:15 PM

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरु झालं आहे. जर तुम्हीही लग्न बंधनात अडकणार आसाल तर चेहऱ्यावर ग्लो  (Skin Care Tips For Bride To Be) आणण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु करा. आजकाल ब्युटी पार्लरमध्येही लग्नापूर्वी फेअरनेस ट्रिटमेंट सुरु होतात. पण, जर घरगुती उपायांनी तुम्हाला असा खास ग्लो मिळाला तर? (Skin Care Tips For Bride To Be)

लग्नाच्या खास दिवसाची तयारी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. या काळात तुम्हाला तणाव घ्यायचा नाहीये. तणावाचा खूप वाईट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर होतो.

काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमच्या त्वचेची चांगली काळजी घेवू शकता आणि आकर्षक अशी ग्लोइंग त्वचा मिळवू शकता –

1. आठवड्यात कमीत कमी पाच दिवस 20-30 मिनिटं चालावं. यामुळे तुमचा तणाव कमी होईल आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. यामुळे तुमची त्वचा उजळेल.

2. आजपासून साबणेला बाय बाय करा आणि एखाद्या सौम्य ब्युटी फेस वॉशचा वापर करण्यास सुरुवात करा. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा नीट स्वच्छ करुन घ्या (Skin Care Tips For Bride To Be).

3. रात्रीसाठी एखाद्या अशा मॉइश्चरायझरची निवड करा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतील. जर तुमचं मॉईश्चरायझर व्हिटामिन ए, सी, ई आणि बी 3 युक्त असेल तर तो तुमच्या त्वचेला पोषण देईल.

4. केमिकल युक्त प्रोडक्ट्सचा वापर करणं कटाक्षाने टाळा. कुठलंही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुमच्या त्वचारोगतज्ज्ञचा सल्ला नक्की घ्या. आखणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे वाचवण्यासाठी कधीही प्रौडक्टच्या गुणवत्तेशी तडजोड करु नका.

5. जर तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल आणि तुम्हाला धुळीत काम करायचं असेल तर रोज केस धुणे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. शाम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनर लावणं विसरु नका. तसेच, केसांना तेल लावून मसाजही करा. त्यामुळे केस केस कोरडे आणि निर्जीव दिसणार नाहीत.

Skin Care Tips For Bride To Be

संबंधित बातम्या :

Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.