Skin Care Tips : उन्हाळ्यात मुरूमापासून सुटका करायचीय?, ‘या’ टिप्स वापरा, फरक अनुभवा…

Skin Care Tips : जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचा काळसर होते. चेहऱ्यावरचे छिद्रेही बंद होतात. यामुळे मुरुमाची समस्या निर्माण होते. त्वचेच्या छिद्रांवर तेल, घाण चिटकल्याने मुरुमांचा त्रास सुरू होतो. शिवाय पिंपल्स येण्याचं प्रमाणही वाढतं. उन्हाळ्यात साधारणपणे मुरुमांची समस्या अधिक तिव्रतेने जाणवते.

Skin Care Tips : उन्हाळ्यात मुरूमापासून सुटका करायचीय?, 'या' टिप्स वापरा, फरक अनुभवा...
उन्हाळ्यात मुरूमापासून सुटका करण्यासाठी 'या' टिप्स वापरा...Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 5:10 PM

मुंबई : नुकताच उन्हाळा (Summer) सुरू झालाय. उन्हाळा आला की त्याच्यासोबत त्वचेशी संबंधित अनेक समस्याही आल्याच.उन्हाच्या दाहकतेमुळे घामाच्या धारा सुरू होतात. अश्यात अनेक त्वचेशी संबंधित समस्या उद्भवतात. जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचा काळसर होते. चेहऱ्यावरचे छिद्रेही बंद होतात. यामुळे मुरुमाची समस्या निर्माण होते. त्वचेच्या छिद्रांवर तेल, घाण चिटकल्याने मुरुमांचा (acne) त्रास सुरू होतो. शिवाय पिंपल्स येण्याचं प्रमाणही वाढतं. उन्हाळ्यात साधारणपणे मुरुमांची समस्या अधिक तिव्रतेने जाणवते. जर तुम्हालाही मुरूमाची समस्या जाणवत असेल तर तुम्ही काही आयुर्वेदिक गोष्टीचा वापर करून यापासून सुटका मिळवू शकता…

जेल बेस फेस वॉश वापरा

उन्हाळ्यात जेल बेस फेसवॉश वापरा. असे फेसवॉश किटाणू आणि घाण काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेला स्वच्छता आणि पोषण मिळेल. हे त्वचेला ऑईल फ्री ठेवण्यासही मदत करेन.

फळांवर आधारित टोनर वापरा

चेहरा धुतल्यानंतर फळांचा नर वापरा. हे चेहऱ्याच्या त्वचेतून जास्तीचे तेल, खोल उघडलेले छिद्र काढून टाकण्यास आणि मुरुमांना कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करेल. तुम्ही डाळिंब, गुलाबपाणी, आवळा आणि पुदिनायांचा टोनरदेखील वापरू शकता.

मॅटिफायिंग क्रीम

त्वचा ऑयली असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मॅटफायिंग मॉइश्चरायझर वापरा. हे घाम येण्याच्या समस्या कमी करते. तुम्ही कोकम, हिरवा चहा, गुलाबाचा अर्क, संत्रा, कोरफड, नारळाच्या पाण्यापासून बनवलेले मॅटिफायिंग क्रीम वापरू शकता.

घरगुती हर्बल फेस मास्क

हर्बल फेस मास्कमध्ये केमिकल नसतं. हा फेस मास्क त्वचेला पोषक आणि तरुण ठेवण्यास मदत करतो. कोरफड, बेसन आणि संत्र्याच्या रसाने बनवलेला फेस मास्क तुम्ही वापरू शकता. त्यामुळे सनबर्न, रॅशेस, पिगमेंटेशन कमी होते. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकते.

इतर महत्वाच्या टिप्स

आपण चांगला आहार घेऊन देखील या समस्येला रोखू शकतो. फळं आणि भाज्यांचं सेवन करूनही त्वचेचं आरोग्य राकता येतं. टरबूज, संत्रा, नारळ पाणी, गाजर, पालक, रताळे खावू शकता. शिवाय तुम्हाला वारंवार चेहऱ्याला हात लावण्याची सवय असेल तर ती आता बंद करा. संसर्ग टाळण्यासाठी आपले हात वारंवार धुवा.

संबंधित बातम्या

Skin Care Tips : चेहऱ्याला तजेलदार बनवण्यासाठी घरगुती गोष्टींपासून बनवलेला फेसपॅक वापरा, चमकदार सौंदर्य मिळवा…

Health Tips : रात्री झोप लागत नाही? ‘या’ पाच गोष्टींचा आहारात समावेश करा आणि फरक अनुभवा…

Hair Care Tips : केसगळतीमुळे त्रस्त आहात? करा ‘हे’ उपाय अन् वाढवा केसांची चमक!

'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.