UV rays Skin Care | उन्हाळ्यात अतिनील किरणांपासून असे करा त्वचेचे संरक्षण

अतिनील किरणांमुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात. सूर्यकिरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी अनेकांकडून कृत्रिम प्रोडक्टचा वापर केला जातो. परंतु यातून दुष्परिणामांचा धोका असतो. त्यामुळे काही घरगुती उपायातून तुम्ही अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण करु शकतात.

UV rays Skin Care | उन्हाळ्यात अतिनील किरणांपासून असे करा त्वचेचे संरक्षण
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 9:14 AM

मुंबई : उन्हाळ्याला (summer) सुरुवात झाली आहे. मार्च-एप्रिलमध्ये उन्हाचा पारा तीव्र असतो. उन्हाळ्यात आपल्या शरीरात अमुलाग्र बदल होत असतात. वातावरणात उष्णता असल्याने शरीराचे तापमान संतुलित ठेवणे अत्यंत आवश्‍यक असते. त्यामुळे अनेक जण उन्हाळ्याची वेगळी खरेदी करीत असतात. त्यात सुती कपडे, सनग्लास, टोपी, रुमाल आदींची खरेदी होते. उन्हाळ्यात त्वचेच्यादेखील अनेक समस्या निर्माण होत असतात. उन्हाळ्यात सूर्यापासून निघणारे अतिनील किरणे (UV rays) त्वचेसाठी अत्यंत घातक असतात. त्यापासून त्वचेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्‍यक असते. त्यामुळे बाहेर निघताना अनेक महिला सनकोट परिधान करतात. तसेच काही महिला सनक्रीमच्या माध्यमातून आपली त्वचा हायड्रेड ठेवून तीचे तीव्र उन्हापासून संरक्षण करीत असतात. परंतु अनेकदा बाहेरील रसायनयुक्त प्रोडक्टमुळे त्वचेवर दुष्परिणाम जाणवत असतात. अशा वेळी त्वचेचे संरक्षण करण्यासाठी घरगुती उपाय (home remedies) योजना करणे आवश्‍यक ठरत असते.

कांद्याचा रस आणि सफरचंद सायडर व्हिनेगर

यासाठी पहिल्यांदा कांदा कापून घ्या, कांद्याचा रस व सफरचंद सायडर व्हिनेगर यांना समान मात्रेत मिश्रीत करुन घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एका सुती कपड्याने किंवा कापसाने चेहरा व मान, गळा आदी ठिकाणी लावा. साधारणत: अर्धा तास तसच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने धुवावे.

लिंबूचा रस

एका वाटीत एक किंवा दोन लिंबू पिळून घ्यावे, आता सुती कापडाने अतिनील किरणांनी प्रभावीत झालेल्या त्वचेवर हा रस लावावा. त्यानंतर अर्धा तासानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धूवावी. त्यानंतर त्वचेला हायड्रेड ठेवणारी एखादी क्रीम लावावी. आठवड्यातून तीन वेळा याचा प्रयोग करु शकतो.

दूध आणि हळद

अर्धा कप दुधामध्ये चिमटीभर हळद मिश्रीत करावी. त्यानंतर हे मिश्रण चेहरा तसेच मान, गळा आदी ठिकाणी लावावे. ते कोरडे झाल्यावर त्याला साध्या पाण्याने धुवावे, हळदीत अनेक महत्वपूर्ण गुणधर्म असल्याने यातून त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. हळद क्लींजर म्हणूनही उपयोगी पडत असते.

मध आणि पपई

साधारणत: कपभर पपईचे तुकडे घ्यावे, ते चांगले बारीक करुन त्याची पेस्ट तयार करावी, आता यात एक मोठा चमचा मध घालावे. हे दोघी घटक एकत्र मिश्रीत करुन त्याचा लेप चेहरा, मान, गळा, हात, पाठ आदींवर लावावा. साधारणत: अर्धा तास हे मिश्रण त्वचेवर राहू द्यावे, त्यानंतर साध्या पाण्याने धुवावे. यामुळे त्वचेची जळजळ कमी होते, डाग नाहिसे होतात, पुरळ कमी करण्यासही हा लेप उपयोगी आहे.

कोरफड

त्वचेच्या सर्व समस्यांसाठी कोरफडीचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. कोरफडमध्ये अनेक महत्वपूर्ण घटक असतात. कोरफडीचा गर रोज त्वचेवर लावावा. यात लेपात चिमुटभर हळद टाकल्यास याचे पोषक घटक अधिक वाढत असतात. रोज आठवडाभर याचा उपयोग करावा.

संबंधित बातम्या :

चमकदार त्वचेसाठी ‘हे’ नैसर्गिक फेसपॅक ठरतील फायदेशीर

काळ्या पडलेल्या त्वचेला नविन लकाकी आणण्यासाठी टोमॅटोचा वापर करुन नितळ त्वचा मिळवा!

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी टोनर अत्यंत फायदेशीर, टोनर वापरण्याची पद्धत जाणून घ्या!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.