Summer skin care: गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये या गोष्टी मिसळून बनवा फेसपॅक, त्वचा तजेलदार होईल!
गुलाब (Rose) आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुलाब पाण्याच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. इतकेच नाहीतर गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा (Skin) सुंदर होण्यासही मदत होते. आपल्या त्वचेसाठी फक्त गुलाब पाणीच नव्हेतर गुलाबाच्या पाकळ्या देखील खूप फायदेशीर आहेत.
मुंबई : गुलाब (Rose) आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुलाब पाण्याच्या मदतीने आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. इतकेच नाहीतर गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा (Skin) सुंदर होण्यासही मदत होते. आपल्या त्वचेसाठी फक्त गुलाब पाणीच नव्हेतर गुलाबाच्या पाकळ्या देखील खूप फायदेशीर आहेत. सहसा आपण गुलाबाचे फुल देवासाठी किंवा डेकोरेशनसाठी वापरतो. मात्र, गुलाबाच्या पाकळ्यांच्या मदतीने आपण अनेक प्रकारचे फेसपॅक (Facepack) देखील तयार करून त्वचेची काळजी घेऊ शकतो. हे फेसपॅक घरच्या-घरी कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊयात.
- बेसन आणि गुलाबाच्या पाकळ्या- हा पॅक बनवण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि बेसन व्यतिरिक्त तुम्हाला मध आणि दहीही लागेल. हा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. एका वाटी घ्या आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून पेस्ट तयार करा. पेस्टमध्ये मध, दही आणि बेसनही मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण 30 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. हे सर्व घटक त्वचेला हायड्रेट आणि मुलायम ठेवण्यास मदत करतात.
- चंदन आणि गुलाबाच्या पाकळ्या- चंदनापासून बनवलेले स्किन केअर प्रोडक्ट्स उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानले जातात. दुधाच्या मदतीने गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवा आणि त्यात चंदन पावडर घाला. त्यात थोडं थंड पाणी टाका आणि हा पॅक हलक्या हातांनी चेहऱ्याला लावा. इतर पॅकप्रमाणेच हा पॅक चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
- गुलाब पाकळ्या आणि नारळ तेल- हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 2 चमचे नारळ तेल घ्या आणि 5 चमचे गुलाब पाकळ्यांची पेस्ट घ्या.1 चमचे लव्हेंडर तेल आणि 1 चमचे दही लागेल. हे सर्व घटक मिक्स करून चांगली पेस्ट बनवा. संपूर्ण चेहऱ्यावर ही पेस्ट लावा. सुमारे 15-20 मिनिटांसाठी हा पॅक चेहऱ्यावर राहूद्या. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.
- मध आणि गुलाबाच्या पाकळ्या- मध आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. गुलाब पाकळ्या आणि मधापासून आपण खास पॅक चेहऱ्यासाठी वापरू शकता. दुधाच्या मदतीने गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून पेस्ट बनवा आणि एका भांड्यात ठेवा. आता त्यात दोन चमचे मध घालून हा पॅक चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे असेच राहू दिल्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. थंड पाण्याने चेहरा धुवा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा महत्वाची माहिती!
Non Stop LIVE Update