Beauty Tips : आयब्रो नैसर्गिकरित्या जाड आणि काळ्या करायच्या असतील तर ‘या’ खास टिप्स फाॅलो करा!
काळ्या आणि जाड भुवया प्रत्येक मुलीला आवडतात. कारण त्या सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. जर डोळे मोठे आणि सुंदर असतील आणि भुवया मात्र, पातळ असतील तरी देखील काहीही उपयोग होत नाही. हेच कारण आहे की बहुतेक मुली थ्रेडिंग वगैरे करून आपल्या भुवया चांगल्या आकारात ठेवतात.
मुंबई : काळ्या आणि जाड भुवया प्रत्येक मुलीला आवडतात. कारण त्या सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. जर डोळे मोठे आणि सुंदर असतील आणि भुवया मात्र, पातळ असतील तरी देखील काहीही उपयोग होत नाही. हेच कारण आहे की बहुतेक मुली थ्रेडिंग वगैरे करून आपल्या भुवया चांगल्या आकारात ठेवतात आणि मेकअप करताना पेन्सिलच्या मदतीने भुवया गडद करतात. नैसर्गिकरित्या भुवया काळ्या आणि जाड बनवण्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत.
भुवया जाड आणि गडद करण्यासाठी नैसर्गिक उपाय
-रोज रात्री झोपताना भुवयांना ऑलिव्ह ऑईलने मसाज करा. किमान 5 मिनिटे मसाज करणे आवश्यक आहे. तुम्हाला काही दिवसात फरक दिसू लागेल.
-कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी देखील चांगला मानला जातो. भुवयांच्या जागी कांद्याचा रस लावून दररोज मालिश करा. मोठा फरक पडेल.
-व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये असलेल्या तेलाने दिवसातून दोनदा भुवयांवर मालिश करा. याशिवाय, तुम्ही बदामाच्या तेलाने मालिश देखील करू शकता. बदामाच्या तेलातही व्हिटॅमिन ई मुबलक असते.
-अंड्याचा पांढरा भाग घ्या आणि भुवयांवर 10 ते 15 मिनिटे लावा, नंतर कोमट पाण्याने धुवा. यानंतर 5 मिनिटे एरंडेल तेलाने मालिश करा. आठवड्यातून दोनदा हे केल्याने मोठा फरक पडेल.
-रोज रात्री नारळाच्या तेलात थोडे कापूर मिसळून भुवयांवर लावा. 5 मिनिटे चांगले मालिश करा. त्यानंतर ते रात्रभर सोडा. असे रोज केल्याने भुवयांचा रंग काही दिवसातच गडद होऊ लागेल.
-दिवसातून दोन ते तीन वेळा पेट्रोलियम जेली लावूनही भुवया जाड, काळ्या आणि चमकदार होतात. याशिवाय भुवयांवर पेन्सिल वापरताना नेहमी हलक्या हाताने लावा.
-रोझमेरी तेल आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून लावल्याने भुवया देखील चांगल्या असतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Special tips to make eyebrows naturally thick and black)