पातळ केसांवर अजिबात करू नका ‘हे’ प्रयोग, अन्यथा खराब होतील केस

केस गळणे ही आजकाल मोठी समस्या आहे. केसांची काळजी घेतली नाही की, आपले केस कमकुवत आणि पातळ होतात.

पातळ केसांवर अजिबात करू नका 'हे' प्रयोग, अन्यथा खराब होतील केस
रीठा केसातील कोंड्याच्या समस्येवर देखील चांगला उपाय आहे. केसांतील कोंडा काढून टाकण्यासाठी रीठा पाण्यात भिजत ठेवून, नंतर त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळाशी लावा. या हेअर पॅकच्या निअय्मित वापरणे कोंड्याची समस्या नाहीशी होईल. आंघोळ करण्यापूर्वी आपण पेस्ट केसांमध्ये लावून नंतर केस धुवू शकता.
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 3:55 PM

मुंबई : केस गळणे ही आजकाल मोठी समस्या आहे. केसांची काळजी घेतली नाही की, आपले केस कमकुवत आणि पातळ होतात. मुलींचे केस हे त्यांच्या सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग असल्याने त्यांचे लुक सुधारण्यासाठी तसेच केसांची गुणवत्ता व वाढ सुधारण्यासाठी मुली यावर बरेच प्रयोग करतात. मात्र, हे करून देखील अनेक वेळा केस चांगले होत नाहीत. (Take care of thin hair in this way)

ज्याचे पातळ केस असतात त्या व्यक्ती दररोज केस धुण्यावर भर देतात. मात्र, यामुळे केस गळती जास्त होण्याची शक्यता निर्माण होते. केस चांगले येण्याऐवजी ते अधिक पातळ आणि कोरडे होतात. शक्यतो आठवड्यातून दोन वेळा केस धुतले पाहिजे. केस धुताना कमी प्रमाणातच शॅम्पू वापरला पाहिजे.

बर्‍याच वेळा, महिला घाईघाईने ओल्या केसांमध्ये कंगवा करतात. यामुळे केसांची मुळे ताणतात आणि केस कमकुवत होतात आणि अधिक तुटतात. म्हणून, केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच केस विचरले पाहिजेत. याशिवाय कधीही ओल्या केसांना बांधू नका किंवा वेणी बनवू नका. यामुळे केस खराब होतात.

आज प्रत्येकाला स्टाईलिश आणि स्मार्ट दिसण्याची इच्छा आहे. यामुळे अनेक वेळा केसांना वेगवेगळे कर्लर दिले जातात. यामुळे आपल्या केसांचे नुकसान होते. बऱ्याच वेळा मुली चांगले दिसण्यासाठी केसांच्या हेअर स्टाईल करतात यामुळे केस जास्त तुटतात.

केसांच्या आरोग्य राखण्यासाठी योग्य पोषण आवश्यक आहे. पोषक तत्वांची कमतरता केस गळतीस कारणीभूत होऊ शकते. प्रथिने, आवश्यक चरबी, जस्त आणि लोह हे अशी काही पौष्टिक तत्त्वे आहेत जी केसांच्या वाढीमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतात आणि दाट केसांसाठी उपयुक्त आहेत. मिक्सरमध्ये दोन चमचे मेथीची दाणे घेऊन बारीक करून घ्या. ही पावडर एका भांड्यात घ्या आणि त्यात एक चमचा नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑईल घाला. सर्व सामग्री एकत्र मिक्स करा आणि ही पेस्ट केसांना लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Take care of thin hair in this way)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.