‘डार्क सर्कल’ने त्रस्त आहात? हा आहे रामबाण उपाय…
धावपळीचे जीवन, ताणतणाव, झोप न लागणे आणि वयानुसार हार्मोन्समध्ये होणारे बदल या सर्वांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. ही समस्या दूर करण्यासाठी आपल्या घरातीलच काही गोष्टी खूप उपयुक्त ठरतात.
डोळ्यांखाली ‘डार्क सर्कल’ म्हणजेच काळे वर्तुळ (Dark circles) ही अगदी सामान्य समस्या आहे. परंतु याचा मोठा परिणाम आपला चेहरा व व्यक्तीमत्वावर पडत असतो. खासकरुन महिलांमध्ये याबाबत फार चिंता दिसून येत असते. काळे वर्तुळ घालवण्यासाठी कृत्रिम साधणांचा वापर केला जात असतो. परंतु यातून दुष्परिणामांचा (Side effects) धोका निर्माण होण्याचीही शक्यता असतेच. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली की आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य बिघडते. यातून निराशा, मानसिक तणाव आदी निर्माण होत असतात. अनेकदा तर काळ्या वर्तुळे घालवण्यासाठी (remove dark circles) अनेक महागडे इलाज केले जातात. परंतु त्यातूनही काही साध्य होत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात अशा अनेक कारणांमुळे ही समस्या निर्माण होत असते. काळ्या वर्तुळांना मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपायांवर चर्चा करणार आहोत.
कच्चा बटाट्याचा वापर
कच्चे बटाटे डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळांवर अधिक प्रभावी आहेत. कच्च्या बटाट्याचा रस रोज एका कपड्यावर काढा आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागात लावा. दहा मिनिटे त्याच कापडाने डोळे झाकून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. कच्च्या बटाट्याचा रस दोन ते तीन दिवसांच्या अंतराने लावल्यास काही दिवसांतच सकारात्मक बदल जाणवेल.
‘ग्रीन टी’ठरेल फायदेशीर
ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्ही रोजच्या आहारात ग्रीन टीचा समावेश करीत असाल तर, चहाची वापरलेली पिशवी फेकून देण्याऐवजी ती वापरता येइल. चहाची पिशवी रिकामी झाल्यावर ती बाहेर काढून फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर ही थंड चहाची पिशवी डोळ्यांवर काही वेळ राहू द्या.
गाजराचा रस
गाजराचा रस देखील काळी वर्तुळे कमी करू शकतो. यासाठी पहिल्यांदा गाजर किसून घ्या. नंतर सुती कापडावर ठेवा आणि या गाजराचा रस पिळून घ्या. त्यानंतर ताज्या गाजराच्या रसात कोरफडचे जेल मिसळा आणि पेस्ट बनवा. हे डोळ्याभोवती तसेच चेहऱ्यावर लावा. गाजराच्या रसाच्या मदतीने चेहऱ्याच्या रंगावरदेखील फरक पडू शकतो.
संत्र्याचा रस
संत्र्याच्या रसानेही काळी वर्तुळे दूर करता येतात. संत्र्याचा रस आणि ग्लिसरीन एकत्र करून ठेवा. त्यानंतर त्याच्या काही थेंबांच्या मदतीने डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला मसाज करा. नंतर काही वेळ असेच राहू दिल्यानंतर थंड पाण्याने धुवावे.
संबंधित बातम्या :
या सुपरफूडचा आहारात समावेश करा, झटक्यात वाढेल हिमोग्लोबिनची पातळी…
Hair Care | चमकदार आणि निरोगी केस हवेत? घरच्या घरी तयार करा हेअर ऑईल