Skin Care Tips | सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हे 4 स्क्रब नक्की वापरा…

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, जंतुनाशक आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण, हळद त्वचेवरील डाग, मुरुम आणि इतर समस्या सहजपणे दूर करू शकते. हळदीने त्वचा एक्सफोलिएट करायची असेल तर त्यात पिठीसाखर घालून स्क्रब करा.

Skin Care Tips | सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हे 4 स्क्रब नक्की वापरा...
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 6:15 AM

मुंबई : बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमुळे त्वचेचे (Skin) नुकसानही होऊ शकते. जर तुम्हाला घरगुती वस्तूंनी त्वचा स्क्रब करायची असेल तर तुम्ही साखरेपासून बनवलेले हे स्क्रब वापरून पाहू शकता. विशेष म्हणजे हे स्क्रब आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर (Beneficial) असतात आणि खर्चही कमी लागतो. बऱ्याच वेळा आपण स्क्रब पार्लरमध्ये जाऊन करतो किंवा सरळ सरळ विकतचा स्क्रब घरी आणून करतो. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची देखील दाट शक्यता असते. यामुळेच आपण नेहमीच घरगुती वस्तुंची मदत घेत घरच्या-घरीच स्क्रब (Scrub) करायला हवा. हा स्क्रब आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशी ठरतो.

कॉफी आणि साखर

या दोन्ही घटकांमध्ये त्वचेला आतून स्वच्छ करण्याचे आणि चांगले पोषण देण्याचे गुणधर्म आहेत. साखर बारीक करून त्यात कॉफी घाला आणि थोडा वेळ राहू द्या. आता याने त्वचा एक्सफोलिएट करा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. त्वचा खोल स्वच्छ होईल आणि पोषणही मिळेल. हा स्क्रब आपण आठ दिवसांमधून दोनदा चेहऱ्याला लावायला हवा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

ओट्स आणि साखर

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ओट्स आणि साखरेचा स्क्रब बनवा. ओट्स-शुगर स्क्रबमध्ये मध आणि गुलाबपाणी घाला. ओट्स त्वचा स्वच्छ करेल आणि मधामुळे त्वचा मुलायम होईल. जसे ओट्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच ते आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ओट्स आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते.

हळद आणि साखर

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, जंतुनाशक आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण, हळद त्वचेवरील डाग, मुरुम आणि इतर समस्या सहजपणे दूर करू शकते. हळदीने त्वचा एक्सफोलिएट करायची असेल तर त्यात पिठीसाखर घालून स्क्रब करा. विशेष म्हणजे हळद चेहऱ्याचा रंग सुधारण्यासही मदत करते.

बदामाचे तेल आणि साखर

ज्या लोकांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी त्यांच्या सौंदर्य निगामध्ये बदामाचे तेल आणि साखरेचा स्क्रब वापरावा. बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन ई असते, जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तसेच आपण दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर त्वचेला बदामचे तेल नक्कीच लावावे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.