Hair Oil Benefits : सुंदर आणि चमकदार केस मिळवण्यासाठी ‘हे’ तेल नियमितपणे लावा!
केसांची काळजी घेतल्याने केस गळती आणि केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. लांब आणि निरोगी केसांसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण केसांना नियमितपणे तेल लावले पाहिजे. केसांना तेल लावल्यामुळे तेलकट केस होतात म्हणून अनेकजण केसांना तेल लावणे टाळतात.
मुंबई : केसांची काळजी घेतल्याने केस गळती आणि केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. लांब आणि निरोगी केसांसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण केसांना नियमितपणे तेल लावले पाहिजे. केसांना तेल लावल्यामुळे तेलकट केस होतात म्हणून अनेकजण केसांना तेल लावणे टाळतात. मात्र, निरोगी आणि सुंदर केसांसाठी केसांना तेल लावणे आवश्यक आहे. (These 5 oils are beneficial for beautiful and shiny hair)
खोबरेल तेल
सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या तेलांपैकी एक खोबरेल तेल केसांच्या वाढीस मदत करते. यात पौष्टिक गुणधर्म आहेत जे आपले टाळू निरोगी बनवते आणि केसांच्या कवकांना मजबूत करते. खोबरेल तेलामध्ये कढीपत्ता, मेथीचे दाणे यासारखे नैसर्गिक घटक मिक्स करून वापरले जाऊ शकते. जे आपल्या केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
बदाम तेल
बदामाचे तेल त्वचेसाठी आणि केसांसाठी उत्तम तेल मानले जाते. त्यात फॅटी अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रथिने असतात. बदामाचे तेल तुमच्या कोरड्या आणि खराब झालेल्या केसांना मॉइश्चराइझ करते तसेच केसांच्या वाढीस मदत करते. आपण सुंदर केस मिळवण्यासाठी थेट बदामाचे तेल केसांना लावले पाहिजे.
एरंडेल तेल
व्हिटॅमिन ई, खनिजे आणि प्रथिने समृद्ध, एरंडेल तेल आपले केस दाट करण्यास आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास मदत करते. एवढेच नाही, एरंडेल तेल केसांच्या अनेक समस्या जसे कोंडा, कोरडेपणा इत्यादींवर उपचार करण्यास मदत करू शकते. एरंडेल तेलामध्ये आपण बदाम तेलही मिक्स करू शकतो.
ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जे टाळूला पोषण देते आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट घटक आपल्या केसांसाठी कंडिशनर म्हणून काम करतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये आपण जास्वंदाचे फुल मिक्स करूनही केसांना लावू शकतो. हे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.
डोक्यातील कोंडावर उपचार
तिळाच्या तेलात अँटीमाइक्रोबायल्स असतात. जे डोक्यातील कोंडावर उपचार करण्यास मदत करतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या टाळूवर तिळाच्या तेलाची मालिश केल्याने टाळू शांत होण्यास आणि डोक्यातील कोंडा कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, तिळाचे तेल टाळूला मॉइश्चराइझ करण्यास मदत करू शकते. हे टाळूच्या खाज सुटण्यास मदत करते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(These 5 oils are beneficial for beautiful and shiny hair)