Skin Care : होळी खेळल्यानंतर त्वचेवर अॅलर्जी होते? मग हे 5 उपाय नक्कीच कामी येतील!
होळीचा (Holi) सण सर्वजण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात. मात्र, आजकाल रंग (Colors) आणि गुलालमध्ये अनेक प्रकारचे रसायने वापरली जातात. यामुळे आपल्या त्वचेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर अॅलर्जी, जळजळ, खाज सुटणे आदी समस्या निर्माण होतात.
मुंबई : होळीचा (Holi) सण सर्वजण अतिशय उत्साहामध्ये साजरा करतात. मात्र, आजकाल रंग (Colors) आणि गुलालमध्ये अनेक प्रकारचे रसायने वापरली जातात. यामुळे आपल्या त्वचेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर अॅलर्जी, जळजळ, खाज सुटणे आदी समस्या निर्माण होतात. काही लोकांची त्वचा (Skin Care) निस्तेज होते आणि चमक नाहीशी होते. होळीनंतर तुमच्यासोबत अशी कोणतीही समस्या उद्भवली असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला अशा काही पद्धती सांगणार आहोत ज्या या समस्या दूर करण्यास मदत करतात.
- तूप- होळी खेळल्यानंतर त्वचेमध्ये जळजळ असेल तर आपल्या त्वचेवर तूप लावा. जर आपल्याकडे तूप नसेल तर आपण खोबरेल तेल देखील लावू शकतो. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होईल. यामुळे खाज येणे, जळजळ, पुरळ येणे इत्यादी समस्या दूर होतात. मात्र, हे नेहमी लक्षात ठेवा की, तूप किंवा खोबरेल तेल लावल्यानंतर अजिबात घराच्या बाहेर पडू नका.
- एलोवेरा- एलोवेरा जेल त्वचेला ग्लो आणण्यासोबतच स्किन अॅलर्जी दूर करण्याचे काम करते. यासाठी एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ कोरडे राहू द्या. त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा. शक्य असल्यास दिवसातून किमान दोनदा हे करा. या खास उपायामुळे चेहऱ्यावर एक चमक येते.
- कडुलिंब- तुमच्या चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा पुरळ बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाने खूप फायदेशीर आहेत. यासाठी सात ते आठ कडुलिंबाची पाने घ्या आणि स्वच्छ धुवून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थिर लावा. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे अॅलर्जी कमी होण्यास मदत होईल.
- दही आणि बेसन- चेहऱ्यावरील रंग काही केल्या जर निघत नसेल तर आपण हा खास घरगुती उपाय करून चेहऱ्यावर रंग काढू शकतो. यासाठी आपल्याला दोन चमचे बेसन पीठ आणि तीन चमचे दही लागणार आहे. दही आणि बेसन चांगले मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील रंग निघून जाण्यास मदत होईल.
- मसूर डाळ- चेहऱ्याची चमक परत आणण्यासाठी मसूरचा पॅकही खूप उपयुक्त आहे. यासाठी लाल मसूर काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. यानंतर मसूर बारीक करून त्यात थोडे दूध आणि मध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा होऊ द्या. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.
संबंधित बातम्या :
Teeth | मजबूत अन् चमकदार दातांसाठी फळांचा वापर ठरेल फायदेशीर! जाणून घ्या 5 फळांबद्दल
Corona | प्रसुतीकाळात मातेपासून बाळाला कोरोनाचा धोका? काय सांगतोय नवीन अभ्यास…