Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Super Seeds For Skin : सौंदर्याचा खजिना आहेत या 5 बिया, आहारात नक्की करा समावेश

तुम्ही अनेक प्रकारच्या सुपर सीड्सचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये भोपळ्याच्या बिया, चिया बिया, फ्लेक्स बिया, भांग बिया आणि सूर्यफुलाच्या बियांचा समावेश होतो. या बियांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात तर करू शकताच, पण फेस मास्क म्हणूनही वापर करू शकता.

Super Seeds For Skin : सौंदर्याचा खजिना आहेत या 5 बिया, आहारात नक्की करा समावेश
सौंदर्याचा खजिना आहेत या 5 बिया, आहारात नक्की करा समावेश
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 3:20 PM

मुंबई : हल्लीचे धकाधकीचे जीवन, रासायनिक उत्पादने, खराब जीवनशैली आणि अस्वस्थ आहार यांमुळे आपल्या त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. यामुळे त्वचेशी संबंधित मुरुम, काळे डाग, पुरळ आणि कोरडी त्वचा अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. निरोगी त्वचेसाठी निरोगी आहार, व्यायाम आणि जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टी तुमची त्वचा निरोगी(Healthy Skin) ठेवण्यास मदत करतील. तुम्ही अनेक प्रकारच्या सुपर सीड्स(Super Seeds)चा आहारात समावेश करू शकता. यामध्ये भोपळ्याच्या बिया, चिया बिया, फ्लेक्स बिया, भांग बिया आणि सूर्यफुलाच्या बियांचा समावेश होतो. या बियांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात तर करू शकताच, पण फेस मास्क म्हणूनही वापर करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरुमं, डाग, जळजळ दूर करण्यास मदत होते. (These 5 seeds, which are a treasure of beauty, are included in the diet)

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर झिंक असते. यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया हा एक उत्तम पर्याय आहे. भोपळ्याच्या बियांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. तसेच मुक्त रॅडिकल्सपासून तुमचे संरक्षण करण्यासही मदत होते. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड असते. ते त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतात. ते त्वचेला नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते.

चिया बियाणे

चिया बिया त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. या बिया अनेक पोषक तत्वांनी युक्त असतात. या बिया त्वचेला पोषण देतात. त्यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडही असते. त्यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते. या बियांची पेस्ट किंवा पुडिंगमध्ये समावेश करून तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.

अळशीच्या बिया

या बियांमुळे आपल्या शरीरातील हार्मोनल असंतुलन दूर करण्यास मदत होते. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमं असतील, तर आपण फेस मास्क म्हणून फ्लेक्ससीड्स देखील वापरू शकता. ते तुमच्या त्वचेला मुरुमांपासून मुक्त होण्यास आणि जळजळ दूर करण्यास मदत करतात. या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

भांगच्या बिया

भांगच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, क्लोरोफिल, लोह आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. यामुळे भांगाच्या बिया देखील आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. या बिया आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. या बिया कोलेजनचे उत्पादन वाढवू शकतात. ते वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करू शकतात आणि तुमची त्वचा चमकदार आणि पौष्टिक बनवू शकतात.

सूर्यफूल बिया

सूर्यफूल बिया देखील सुपरफूड बिया आहेत. हे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. झिंक, जीवनसत्त्वे ए, बी1 आणि ई व्यतिरिक्त, त्यात तांबे, मॅग्नेशियम आणि लोह देखील असतात. या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला लवकर वृद्धत्वापासून वाचवण्यास मदत करतात. (These 5 seeds, which are a treasure of beauty, are included in the diet)

इतर बातम्या

Black Pepper Essential Oil : आरोग्यासाठी अतिशय लाभदायी आहे काळी मिरीचे तेल, जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

Winter Superfoods : हिवाळ्यात ‘या’ सुपरफूड्सचा आहारात नक्की समावेश करा आणि निरोगी राहा!