Hair Care Tips : केस नैसर्गिकरीत्या मजबुत बनवायचे आहेत? या पोषक तत्त्वांचा आहारात समावेश करा!

Hair Care Tips : निरोगी केसांसाठी सकस आहार सेवन करणे गरजेचे आहे. जर आपण सकस आहार घेतला तर आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहते. आपल्या केसांना आवश्यक सगळे पोषक तत्व देखील प्राप्त होतात.

Hair Care Tips : केस नैसर्गिकरीत्या मजबुत बनवायचे आहेत? या पोषक तत्त्वांचा आहारात समावेश करा!
Hair Care Tips
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 12:12 PM

मुंबई : केस मजबूत बनवायचे असतील तर ब्युटी प्रोडक्टव्यतिरिक्त सकस आहार घेणे गरजेचे आहे. आपल्याला आहारामध्ये (Diet) पोषक तत्वांचा जास्त समावेश करायला हवा. ज्या पदार्थांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल भरपूर प्रमाणात असतात असे पदार्थ (Foods) आपल्याला दिवसभरातून एकदा तरी खायला पाहिजे. या सर्व पोषक तत्वांचा आपल्या आहारात समावेश केल्याने आपल्या केसांचे आरोग्य देखील चांगले राहते. जर तुम्हाला केसांसंबंधित कोणत्याही समस्या असतील तर या सगळ्या समस्या या पोषक तत्वांमुळे दूर होतात. आपल्यापैकी अनेकांना केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस दिवसेंदिवस पातळ होणे,अकाली केसांना पांढरेपण येणे, अकाली टक्कल पडणे यांसारख्या समस्या त्रास देतात. या समस्यांमागे प्रत्येक वेळी ब्युटी प्रोडक्ट कारणीभूत असतात असे नाही, काही वेळा आपल्या आहारातील पोषक तत्वांचा अभाव देखील कारणीभूत ठरतो. चला तर मग जाणून घेऊया की, आपल्याला केसांच्या मजबुतीसाठी (Hair Care Tips) नेमके कोण कोणते पोषक तत्व आपल्याला आहारामध्ये अवश्य समाविष्ट करायला पाहिजेत याबद्दल…

व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए मुळे आपले केस मॉइस्चराइज होण्यास मदत होते. या पोषक तत्वामुळे आपल्या केसांची वाढ देखील लवकर होते. रताळे, भोपळा यांसारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ए ची मात्रा जास्त असते म्हणून या पदार्थांचा आपल्या आहारात जास्त प्रमाणात समावेश करा.

व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन बी मुळे आपल्या स्कल्प पर्यंत ऑक्सिजन आणि अन्य पोषक तत्व पोहचण्यासाठी मदत मिळते. आपल्या केसांची लांबी या तत्वामुळे वाढते. केळी, कडधान्य, अन्य डाळी इत्यादी पदार्थांमध्ये यात व्हिटॅमिन ची मात्रा जास्त असते.

व्हिटॅमिन सी

आपल्या शरीरातील कोलेजन निर्मिती साठी व्हिटॅमिन सी अत्यावश्यक असते. या घटकांमुळे आपले केस निरोगी राहतात. द्राक्षे, आवळा, संत्री, मोसंबी यांसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असतात.

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई हे ऑक्सीडेंटिव तणाव रोखण्यासाठी मदत करतो. या पोषक तत्वांमुळे आपले केस गळत नाहीत. बदाम, पालक, कंदमुळे इत्यादी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते. या पदार्थांचे सेवन करून तुम्ही आपले शरीर व केस निरोगी ठेवू शकता.

प्रोटीन

आपल्या केसांचे आरोग्य निरोगी राखायचे असल्यास आपल्या आहारात जास्तीत जास्त प्रोटीन्स पदार्थांचा समावेश करायला हवा. दूध, दही, डेअरी प्रोडक्ट, अंडी, मासे यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये प्रोटीन्सची मात्रा अधिक असते.

आयर्न

लोह म्हणजेच आयरन आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी लाभदायक ठरते.जर आपल्या शरीरात लोह कमी असेल तर अशक्तपणा तर जाणवतो त्याचबरोबर आपल्या केसांचे आरोग्य देखील बिघडते. केसांना मजबूत बनवायचे असेल तर आपल्याला आहारात फळे,कडधान्य, बीट,गाजर,यासारखे पदार्थ अवश्य समावेश करा.

बायोटिन

बायोटिन आपल्या शरीरातील केराटिन निर्मितीसाठी उपयुक्त ठरते. शरीरात बायोटिन तत्व वाढवायचे असल्यास आपल्या आहारात अंड्याचा पिवळा बलक, रताळे आणि मशरूम इत्यादी पदार्थांचा आहारात अवश्य समावेश करा.

झिंक

जर आपल्या आहारात झिंक युक्त पदार्थ असतील आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते.आपल्या केसांच्या लांबीसाठी झिंक गरजेचे ठरते. झिंक मुळे आपल्या केसातील कोडा कमी होतो ,केसांची वाढ लवकर होते. जर केसांचे इन्फेक्शन रोखायचे असल्यास आपल्या आहारात झिंक युक्त पदार्थांचा नक्की समावेश करा. डाळ,सुका मेवा यासारख्या पदार्थांमध्ये झिंक जास्त असते.

इतर बातम्या

Olive Oil Benefits : ऑलिव्ह ऑईल त्वचा, केस आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा महत्वाची माहिती!

Breakfast: नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा, परंतु नाश्त्यामध्ये काय खावे आणि काय नाही, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.