अफगाणी तरुणी इतक्या सुंदर कश्या? या दोन ड्रायफ्रुट्समध्ये दडलंय रहस्य
अफगाणी पुरुष आणि स्त्रीयांचे मजबूत शरीर आणि सुंदरतेसाठी त्यांच्या आहाराच्या सवयी जबाबदार आहे. अफगाणी महिला आणि पुरुष चालता फिरता कधीही ड्रायफ्रूटचे सेवन करतात. त्यामुळे त्यांचे शरीर तरुण, सुंदर आणि मजबूत बनते.
ड्रायफ्रूट्सचे शरीरासोबतच सौंदर्यालाही अनेक फायदे होतात. ड्रायफ्रूट्स शरीराला आजारापासून दूर ठेवण्यासोबतच सौंदर्यही वाढवतात. भारतासह जगभरात अफगाणिस्तानच्या ड्रायफ्रूट्सला मागणी असून अफगाणिस्तान हे सुक्यामेव्यांच केंद्र आहे. अफगाणिस्तानमधील प्रत्येक घरात रोज ड्रायफ्रूट्सचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, अफगाणी स्त्रीया आणि पुरुष इतके उंच आणि सुंदर का असतात? ब्रिटिशांचे सौंदर्यही त्यांच्या तुलनेत फिके पडते. अफगाणी स्त्रियांचे मजबूत शरीर आणि सौंदर्याला त्यांच्या आहाराच्या सवयी जबाबदार आहेत. अफगाणी पुरुषच नव्हे तर महिलाही चालता फिरता कधीही ड्रायफ्रूटचे सेवन करतात. त्यामुळे त्यांचे शरीर तरुण, सुंदर आणि मजबूत बनते.
अंजीर, बदाम, पिस्ता, बेदाने याबद्दल बोलायचं झालं तर हे सर्व ड्रायफ्रूट्स देशात आणि जगभरात लोकप्रिय आहेत. पण असे कोणते ड्रायफ्रूट्स आहे जे शरीराला मजबूत बनवते, तरुण ठेवते त्यासोबतच सौंदर्य वाढवते. तर जाणून घेऊया की अफगाणी लोक कोणते ड्रायफ्रूट खाता जे त्यांना मजबूत आणि तरुण ठेवतात.
सुपर फूड म्हणजे अंजीर
अंजीर हे एक सुपर फूड आहे. ज्याचे असंख्य फायदे आहेत. त्याची चव आणि फायदे दोन्ही अतुलनीय आहेत. अंजीर खाल्ल्यास पचन संस्था चांगली राहते. अंजीर हे कमकुवत शरीराला मजबूत बनवते. पोटॅशियम आणि ओमेगा थ्री ऍसिड भरपूर असलेल्या अंजीर खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. वाढत्या वजनावर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. अंजीरच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी वृद्धत्व रोखले जाते. चेहरा गुलाबी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी देखील अंजीर सर्वोत्तम ड्रायफ्रूट आहे.
आवडते ड्रायफ्रूट आहे मखाना
शरीराला बळकटी देण्यासाठी मखाना फायदेशीर आहे. मखाना वजन वाढण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे पोट भरते आणि भूक देखील नियंत्रणात राहते. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध मखाना हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मखाना फायदेशीर आहे. मखानाचे सेवन केल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी देखील मखाना फायदेशीर आहे. मखाना पुरुष आणि स्त्रियांमध्ये वंधत्वावर उपचार करते. मखानामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते आणि स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम देते.
अँटिऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध मखाना त्वचेला चमकदार आणि सुंदर बनवते याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा तरुण दिसते. मखाना शरीराला फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. यामुळे वृद्धत्व येत नाही आणि त्वचा तरुण दिसते. मखानामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. मधुमेह असलेल्या रुग्णांनी मखानाचे सेवन केल्यास ते सहजपणे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकतात.