Aloe Vera Face Packs : त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 कोरफड फेसपॅक नक्की वापरून पाहा!

कोरफड ही एक अशी वनस्पती आहे. जी आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो कोरफडमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात.

Aloe Vera Face Packs : त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 5 कोरफड फेसपॅक नक्की वापरून पाहा!
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 8:56 AM

मुंबई : कोरफड ही एक अशी वनस्पती आहे. जी आपल्या आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो कोरफडमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात. (This 5 Aloe Vera Facepack is beneficial for relieving skin problems)

आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण घरचे-घरी कोरफडचे फेसपॅक तयार करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि मुलायमदार होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या 

कोरफडच्या पानांमधील गर काढा. त्यानंतर हे आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण कोरफडचा गर रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेला लावायला हवा. त्यानंतर सकाळी थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या

विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे सामान्य बाब आहे. मात्र, अत्यंत कमी वयामध्ये देखील चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची समस्या बऱ्याच वेळा निर्माण होते. अशावेळी आपण कोरफडच्या गरामध्ये हळद मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर लावली पाहिजे. ज्यामुळे सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील टॅन काढण्यासाठी

चार चमचे कोरफड गर घ्या आणि त्यामध्ये बदाम तेल मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा उपाय आपण आठ दिवसातून दोनदा केला पाहिेजे. ज्यामुळे टॅनची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

सेबमचे प्रमाण नियंत्रित करते

कडुलिंब आणि कोरफड त्वचेला आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. हे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. यामुळे पुरळ आणि लालसरपणा कमी होतो. दोन्ही घटकांच्या नियमित वापराने, त्वचा चमकदार आणि तरुण दिसते.

कोरड्या त्वचेची समस्या

कोरडी त्वचा, लालसरपणा आणि जळजळ या समस्या दूर करण्यासाठी कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो. केळी आणि मध ज्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म आहेत. हे कोरडेपणापासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. एका वाडग्यात 1 टीस्पून कोरफड जेल, 1 टीस्पून मॅश केलेले केळे आणि 1 टीस्पून मध मिसळा. सर्व साहित्य चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक तुमची त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज्ड ठेवण्यास मदत करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This 5 Aloe Vera Facepack is beneficial for relieving skin problems)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....