Skin Care Tips : चेहऱ्याची त्वचा निस्तेज झालीये? मग, ‘हे’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

ओट्स खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसेच ओट्स आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतात. आपण घरचे-घरी ओट्स फेसपॅक तयार करू शकतात.

Skin Care Tips : चेहऱ्याची त्वचा निस्तेज झालीये? मग, 'हे' फेसपॅक नक्की ट्राय करा!
ओट्सचा फेसपॅक
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 11:53 AM

मुंबई : ओट्स खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तसेच ओट्स आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असतात. आपण घरचे-घरी ओट्सचे फेसपॅक तयार करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होईल. कारण ओट्समध्ये असे बरेच गुण आहेत जे मुरुमांपासून आणि पिंपल्सपासून मुक्त होण्यास मदत करतात. (This face pack is beneficial for eliminating skin problems and getting beautiful skin)

1. ओट्समध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे मेलेनिनला संतुलित करते आणि गडद रंग गोरा बनवते. ते वापरण्यासाठी आपल्याला एक चमचा मध आणि एक चमचा ग्राउंड ओट्सची आवश्यकता असेल. दोन्ही गोष्टी मिसळा आणि पेस्ट प्रमाणे तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपला चेहरा गोरा होण्यास मदत होते.

2. ओट्समध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे त्वचेस मुरुमांपासून संरक्षण करतात. दोन चमचे ओट्स, एक चमचा बेकिंग सोडा आणि पाणी घ्या, आता ओट्स पीसून त्यात बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट गळ्यापासून संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. कोरडे झाल्यानंतर, थंड पाण्याने तोंड धुवा.

3. अॅपल साइडर व्हिनेगर आणि ओट्सचे फेसपॅक आपण घरी तयार करू शकतो. हे तयार करण्यासाठी ओट्सचे पीठ आणि अॅपल साइडर व्हिनेगर मिक्स करावे. हे चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. हा पॅक कोरडा होईपर्यंत चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर स्वच्छ थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे त्वचेला चमक येईल. हे फेसपॅक ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स काढून टाकण्यास देखील मदत करते. यामुळे त्वचेची पीएच पातळी संतुलित राहते.

4. ओट्स आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे जवळ जवळ प्रत्येकालाच ठाऊक आहे. ओट्स आपल्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतात. आपल्या चेहर्‍यावरील मुरुमांचे चट्टे कमी करुन ते आपल्या त्वचेचा रंग हलका करतात. त्यांच्यात असलेले अमीनो ऍसिड त्वचेचा रंग हलका करतात. ओट्समध्ये असलेले व्हिटॅमिन-ई त्वचेच्या पेशींची उपयुक्त असतात. ओट्स स्क्रबचा उपयोग मुरुम कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

डोळ्यांखाली वारंवार सूज येतेय? मग, ‘हे’ उपाय नक्की करून पाहा!

(This face pack is beneficial for eliminating skin problems and getting beautiful skin)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.