Skin Care : पपईची साल अन् मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, ट्राय करून पाहाच

चमकदार, तजेलदार आणि सुंदर चेहरा कोणाला नको असतो. मात्र, असा चेहरा मिळवण्यासाठी आपल्याला त्वचेची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. कारण आपण जोपर्यंत त्वचेची काळजी घेणार नाहीत.

Skin Care : पपईची साल अन् मुलतानी मातीचा फेसपॅक चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर, ट्राय करून पाहाच
फेसपॅक
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 7:41 AM

मुंबई : चमकदार, तजेलदार आणि सुंदर चेहरा कोणाला नको असतो. मात्र, असा चेहरा मिळवण्यासाठी आपल्याला त्वचेची काळजीही तेवढीच घ्यावी लागते. कारण आपण जोपर्यंत त्वचेची काळजी घेणार नाहीत. तोपर्यंत आपली त्वचा चमकदार आणि सुंदर दिसत नाही. दरवेळी बाजारातील क्रीम चेहऱ्याला लावून चेहऱ्या सुंदर करण्यापेक्षा आपण काही घरगुती उपाय करून सुंदर आणि चमकदार त्वचा मिळू शकतो. (This face pack of papaya peel and multani soil is beneficial for the face)

सुंदर त्वचेसाठी आपण पपईची साल, मुलतानी माती, बदाम तेल आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावला पाहीजे. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपण सर्वात अगोदर पपईच्या सालीचे पेस्ट दोन चमचे, मुलतानी माती एक चमचा, बदाम तेल एक चमचा आणि गुलाब पाणी तीन चमचे मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा.

ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. मात्र, नेहमी हा फेसपॅक लावण्याच्या अगोदर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा आणि मग त्यावर ही पेस्ट लावा. त्यानंतर साधारण तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर आपला चेहऱ्या थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून किमान तीन वेळा लावला पाहिजे. यामुळे चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.

केळीच्या सालीचा फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला केळीची साल, दही, कोरफड, गुलाब पाणी आणि हळद लागणार आहे. हे सर्व साहित्य बारीक करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजेत.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack of papaya peel and multani soil is beneficial for the face)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.