Korean Beauty Tips : चमकदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हे’ होम फेस मास्क फायदेशीर!
सध्याच्या काळात कोरियन ब्युटी टिप्स खूप लोकप्रिय झाल्या आहेत. कोरियन ब्युटी टिप्सची सर्वात खास गोष्ट म्हणजे या टिप्समधील फेम मास्कसाठी सर्व घरगुती साहित्यच लागते. कोरियन लोक त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये नैसर्गिक उत्पादने वापरतात. जर तुम्हालाही तलेदार, चमकदार आणि सुंदर त्वचा कोरियन लोकांसारखी हवी असेल तर तुम्ही होममेड फेस मास्क वापरू शकता.
मुंबई : सध्याच्या काळात कोरियन ब्युटी टिप्स खूप लोकप्रिय झाल्या आहेत. कोरियन ब्युटी टिप्सची सर्वात खास गोष्ट म्हणजे या टिप्समधील फेम मास्कसाठी सर्व घरगुती साहित्यच लागते. कोरियन लोक त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये नैसर्गिक उत्पादने वापरतात. जर तुम्हालाही तलेदार, चमकदार आणि सुंदर त्वचा कोरियन लोकांसारखी हवी असेल तर तुम्ही होममेड फेस मास्क वापरू शकता. (This home face mask is beneficial for getting glowing skin)
हळद आणि मध फेस मास्क
यासाठी तुम्हाला एक चमचा हळद, मध आणि दूध घ्यावे लागेल. या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा. मध आणि हळद त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतात. हळद पिग्मेंटेशन, मुरुमांपासून मुक्त करते.
दूधाचा फेस मास्क
यासाठी एक जिलेटिन घ्या आणि त्यात 2 चमचे दूध घाला. हे मिश्रण गरम करून ते थंड झाल्यावर चेहऱ्यावर लावा. सुमारे 15 मिनिटांनी हे मिश्रण थंड पाण्याने धुवा.
ओटमील मास्क
यासाठी एक चमचा ओट्समध्ये एक चमचा मध आणि दूध मिसळा. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि काही वेळानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा. ओट्स त्वचेची मृत त्वचा काढून टाकण्याचे काम करतात. मॉइस्चराइजिंगसाठी दूध मध फायदेशीर आहे.
ब्राउन शुगर आणि मध
हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा साखर आणि ब्राऊन शुगर मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. ब्राऊन शुगर मृत त्वचा काढून छिद्र साफ करते आणि मध त्वचा मऊ ठेवते. मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. दही मास्क हा फेस मास्क बनवण्यासाठी, एक चमचा दही, ओट्स आणि मध मिसळा. या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(This home face mask is beneficial for getting glowing skin)