Skin care उन्हाळ्यात त्वचेवरील टॅन काढण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा नक्कीच करून पाहा!

उन्हाळा म्हटंले की, त्वचेवर (Skin) टॅन आला म्हणूनच समजा. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे त्वचेवर टॅन जमा होतो. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. या दरम्यान त्वचा काळी पडते. अशा परिस्थितीत त्वचेचा टॅन (Tan) दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. तुम्ही होममेड पॅक आणि स्क्रब वापरू शकता, ते तुमच्या त्वचेवरील टॅन काढण्याचे काम करतात.

Skin care उन्हाळ्यात त्वचेवरील टॅन काढण्यासाठी हे घरगुती उपाय एकदा नक्कीच करून पाहा!
उन्हाळा या टिप्स फाॅलो करा आणि सुंदर त्वचा मिळवाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 6:30 AM

मुंबई : उन्हाळा म्हटंले की, त्वचेवर (Skin) टॅन आला म्हणूनच समजा. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे त्वचेवर टॅन जमा होतो. हानिकारक अतिनील किरणांमुळे त्वचेचे खूप नुकसान होते. या दरम्यान त्वचा काळी पडते. अशा परिस्थितीत त्वचेचा टॅन (Tan) दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय देखील करून पाहू शकता. तुम्ही होममेड पॅक आणि स्क्रब वापरू शकता, ते तुमच्या त्वचेवरील टॅन काढण्याचे काम करतात. हे फेसपॅक (Facepack) आणि स्क्रब नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवले जातात जे तुमच्या त्वचेला खोल पोषण देतात. हे नेमके घरी कसे तयार करायचे हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

कॉफी आणि खोबरेल तेल

कॉफी एक उत्तम एक्सफोलिएटर म्हणून काम करते. तुम्ही स्क्रब म्हणून वापरू शकता. यासाठी तुम्ही 1 चमचे कॉफीमध्ये अर्धा चमचा तेल मिसळा आणि चेहऱ्यावर आणि मानेला लावा. 5 मिनिटे मसाज करा आणि त्यानंतर ते पाण्याने धुवा. तुम्ही आठवड्यातून दोनदा याचा वापर करू शकता.

बटाटा आणि बेसन

बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात. त्यामुळे सन टॅन कमी होतो. उकडलेले बटाटे घ्या, एका भांड्यात किसून घ्या. त्यात दोन चमचे दही, एक चमचा बेसन आणि एक चमचा मध घालून चांगले मिसळा. टॅन झालेल्या त्वचेवर लावा. 20 मिनिटे तसेच राहू द्या, नंतर थंड पाण्याने धुवा,

टोमॅटो आणि साखर

टोमॅटोमध्ये सायट्रिक ऍसिड असते. ते त्वचा सुधारण्यास मदत करते. यासाठी एक मोठा टोमॅटो घ्या आणि तो किसून घ्या. त्यात एक चमचा साखर आणि खोबरेल तेलाचे काही थेंब घाला. चांगले मिसळा, 20 मिनिटे त्वचेवर लावा. जे थंड पाण्याने धुवा. ते आठवड्यातून 3 वेळा वापरू शकता.

पपई आणि बेसन

पपईचे अनेक फायदे आहेत. हे व्हिटॅमिन ए, सी आणि बी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे, ते चेहऱ्याला मॉइश्चरायझेशन ठेवते. अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी करते. काळे डाग कमी करते. पपई मॅश करा, एक चमचा पपईचा लगदा घ्या आणि मॅश करा. त्यात अर्धा चमचा बेसन आणि एक चमचा मध घालून त्वचेवर लावा, त्वचेला एक्सफोलिएट करा, 5 मिनिटे असेच राहू द्या आणि थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Watermelon : वजन कमी करण्यापासून ते दृष्टी वाढवण्यापर्यंत कलिंगड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

Health Care : या जीवनसत्वाची कमतरता आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक, वाचा हे जीवनसत्व नेमके कोणते?

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.