Skin Care : चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे नियमित सेवन करा!
बरेच लोक सुंदर आणि तजेलदार त्वचा (Skin) मिळवण्यासाठी केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेचे अधिक नुकसान होते. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी सकस आहार (Diet) असणे खूप जास्त महत्वाचे आहे. सकस आहार फक्त शरीरासाठीच (Body) चांगला नसून त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
मुंबई : बरेच लोक सुंदर आणि तजेलदार त्वचा (Skin) मिळवण्यासाठी केमिकल युक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेचे अधिक नुकसान होते. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी सकस आहार (Diet) असणे खूप जास्त महत्वाचे आहे. सकस आहार फक्त शरीरासाठीच (Body) चांगला नसून त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, रताळे, हळद, टोमॅटो, पालक आणि अंडी यांसारख्या इतर अनेक पदार्थांचाही आहारात समावेश करावा. यामुळे आपली त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
- गाजर गाजरमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. हे सेबमचे उत्पादन थांबवण्याचे काम करते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. छिद्र अडकण्यापासून प्रतिबंधित करते. त्यात बीटा-कॅरोटीन आणि कॅरोटीनॉइड्स देखील असतात. ते त्वचेला टॅनपासून वाचवण्याचे काम करते.
- पपई पपई केवळ व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत नाही तर त्यात अनेक पाैष्टक घटक असतात, जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. पपईचे रोज सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.
- पालक पालकामध्ये अ, क आणि के जीवनसत्त्वे असतात. हे पोषक घटक त्वचेला तजेलदार बनवण्यास मदत करतात. त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. यामुळे त्वचेच्या वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
- ग्रीन टी ग्रीन टीमध्ये दाहक-विरोधी आणि वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात. हे व्हिटॅमिन बी 12 आणि अँटिऑक्सिडेंट ईजीसीजीचा चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्याने तुमची त्वचा तरूण आणि चमकदार दिसते.
- टोमॅटो टोमॅटो तुमची त्वचा चमकदार बनवण्याचे काम करते. टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते. त्वचेच्या सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर करण्याचे काम करते. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये टोमॅटोचा समावेश करा.
संबंधित बातम्या :
Skin care: पिंपल्सची समस्या कायमची दूर करायची आहे? मग हे घरगुती फेस सीरम नक्की वापरा!
Homemade Scrubs : सन टॅनची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती स्क्रब अत्यंत फायदेशीर!