Homemade Body Pack : मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी ‘हे’ घरगुती बॉडी पॅक फायदेशीर, वाचा! 

चेहऱ्याप्रमाणेच शरीराच्या इतर भागाचीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण होममेड बॉडी पॅक वापरू शकता. बॉडी पॅक आपल्या शरीराची त्वचा डिटॉक्स करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते.

Homemade Body Pack : मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी 'हे' घरगुती बॉडी पॅक फायदेशीर, वाचा! 
सुंदर त्वचा
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 12:55 PM

मुंबई : चेहऱ्याप्रमाणेच शरीराच्या इतर भागाचीही योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण होममेड बॉडी पॅक वापरू शकता. बॉडी पॅक आपल्या शरीराची त्वचा डिटॉक्स करण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होण्यास मदत होते. हे त्वचेवरील टॅन काढून टाकते. कोरड्या आणि निस्तेज त्वचेवर उपचार करते. घरच्या घरी बॉडी पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

बॉडी पॅकसाठी साहित्य

ओट्स पावडर

कॉफी पावडर

तांदळाचे पीठ

गुलाब पाणी

मध

कच्चे दुध

खोबरेल तेल

घरगुती बॉडी पॅक कसा तयार करायचा

तुमचा होममेड बॉडी पॅक बनवण्यासाठी प्रथम 2-3 चमचे कच्चे ओट्स ग्राइंडरमध्ये ठेवा आणि त्यांची पावडर बनवा. ते बाहेर काढा आणि एका लहान भांड्यात ठेवा. त्यात 2-3 चमचे कॉफी पावडर आणि तांदळाचे पीठ घाला. त्यात 2-3 चमचे कच्चे दूध, मध आणि गुलाबपाणी मिसळा. थोडं खोबरेल तेलही टाका. घरगुती बॉडी पॅक तयार करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र मिसळा.

जर ते खूप घट्ट वाटत असेल तर थोडेसे कच्चे दूध किंवा गुलाबपाणी घाला. आता तयार झालेले बॉडी पॅक आपल्या हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांवर लावा. ते कोरडे होईपर्यंत तसेच राहू द्या. काढून टाकण्यापूर्वी, त्वचेला ओल्या बोटांनी एक्सफोलिएट करण्यासाठी मालिश करा. आठ दिवसातून दोन वेळा हे पॅक आपल्या बाॅडीला लावा.

बॉडी पॅकचे फायदे

-ओट्स त्वचेला मऊ करते. या होममेड बॉडी पॅकमध्ये ओट्स पावडरचा वापर करण्यात आला आहे. एक्सफोलिएशनसह, ओट देखील त्वचेला मॉइश्चरायझ करतात. ओट्समध्ये भरपूर जीवनसत्त्वे B1, B2, B3, B6, B9 तसेच झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम, मॅंगनीज इत्यादी खनिजे असतात.

-कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. हे अँटीऑक्सिडंट्स आपल्या त्वचेसाठी खूप चांगले असतात. त्यामुळे आपली त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यास मदत होते. ते त्वचेचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करतात.

-तांदळाच्या पिठात मोठ्या प्रमाणात ब जीवनसत्त्वे आढळून आल्याने नवीन पेशींच्या निर्मितीला चालना मिळते. ते आपली त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी बनवते. तसेच त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत होते. हे कोरडी त्वचा देखील दूर करण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.