पावसाळ्याच्या काळात सर्वाधिक केसगळती का होते? आपल्याला काही आजार तर नाही? जाणून घ्या..

असे बरेच लोक आहेत, ज्यांना पावसाळा अजिबात आवडत नाही. कारण पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.

पावसाळ्याच्या काळात सर्वाधिक केसगळती का होते? आपल्याला काही आजार तर नाही? जाणून घ्या..
सुंदर केस
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 4:41 PM

मुंबई : असे बरेच लोक आहेत, ज्यांना पावसाळा अजिबात आवडत नाही. कारण पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे केस गळती. पावसाळ्याच्या हंगामात अनेक महिला केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात. मात्र, केस गळती नेमकी का होते? त्यामागील नेमके काय कारण आहे हे आज आपण बघणार आहोत. (This is the reason for hair loss during the rainy season)

पावसाळ्यात केस गळणे किती सामान्य आहे?

ट्वीक इंडियाच्या अहवालानुसार डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, जर एका दिवसात 50-100 केस गळत असतील तर ते सामान्य आहे. त्याच बरोबर जर आपण पावसाळ्याबद्दल बोललो तर ही संख्या आणखी वाढू शकते आणि दररोज 200 केसांची गळती होऊ शकते. असे मानले जाते की, पावसाळ्यात केस गळणे 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढते आणि जर अशीच परिस्थिती आपल्या बाबतीत असेल तर जास्त टेन्शन घेऊ नका. ही सामान्य बाब आहे.

कोणता रोग आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे?

आपल्याला सांगितले की पावसाळ्यात केस गळणे किती सामान्य आहे. जर आपले केस यापेक्षाही जास्त गळत असतील तर आपण डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. तसे, हे लक्षात ठेवले पाहिजे की 30 टक्के पर्यंत केस गळणे सामान्य आहे. म्हणून आपल्याला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, परंतु आपले केस किती गळत आहेत यावर आपण लक्ष ठेवले पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की, ज्यामुळे आपण आपली केस गळतीची समस्या दूर करू शकतो.

पावसाळ्यात जास्त केस का गळतात?

आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल की, पावसाळ्याच्या हंगामात जास्त प्रमाणात केस का गळत असतील. याचे कारण म्हणजे पावसामुळे वातावरणात आर्द्रता असते आणि वातावरणात जास्त आर्द्रता असल्यामुळे केसांची मुळे जास्त हायड्रोजन शोषून घेतात. यामुळे आपले केस खराब होण्यास सुरूवात होते, कारण यामुळे केस नाजूक बनतात.

केसांना मॉइश्चराइज्ड ठेवा

पावसाळ्यात केसांची निगा राखणे खूप महत्वाचे असते. आपण सीरम वापरू शकता, जे आपल्या केसांना उष्णतेपासून वाचवेल. हे केसांना मॉइश्चरायझेशन करण्यास देखील मदत करेल. नेहमी एक मॉइश्चरायझर निवडा जे आपल्या केसांना हायड्रेटेड आणि मॉइश्चराइझ ठेवण्यास मदत करेल.

केस रगडून धुणे

केस हा शरीराचा एक नाजूक भाग आहे. बऱ्याचदा केस धुताना मुळाशी घासून धुतले जातात. मुळांना इजा झाल्याने केस तुटतात आणि परिणामी केस पातळ होतात. केसांना आठवड्यातून तीन वेळा शॅम्पू आणि कंडिशनर हे करायलाच हवे. पण हे करत असताना केसांची काळजी घेणे गरजेचे असते. शॅम्पू लावल्यानंतर केसांना हलक्या हातांनी सर्क्युलर मोशनमध्ये मसाज केला तर, केसांना योग्य पोषण मिळते.

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(This is the reason for hair loss during the rainy season)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.