EYE : डोळ्यांखालील काळे डाग आणि सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी हे उपाय फायदेशीर!
जसे आपले वय (Age) वाढते तसे त्वचेची अधिक काळजी घेणे देखील महत्वाचे होते. वाढत्या वयात चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली सुरकुत्या येणे अतिशय सामान्य बाब आहे. तुमच्या डोळ्यांखाली (Eyes) अकाली सुरकुत्या येत असतील तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. कारण जर तुम्ही त्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर समस्या वाढण्याची शक्यता असते.
मुंबई : जसे आपले वय (Age) वाढते तसे त्वचेची अधिक काळजी घेणे देखील महत्वाचे होते. वाढत्या वयात चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली सुरकुत्या येणे अतिशय सामान्य बाब आहे. तुमच्या डोळ्यांखाली (Eyes) अकाली सुरकुत्या येत असतील तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. कारण जर तुम्ही त्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर समस्या वाढण्याची शक्यता असते. डोळ्यांखालील सुरकुत्यांमुळे (Wrinkles) तुमचे वय जास्त दिसते. आजकाल बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत, जी या समस्या दूर करण्याचा दावा करतात, परंतु ते कितपत प्रभावी आहेत?, याबद्दल काहीही सांगता येत नाही. येथे जाणून घ्या, घरगुती उपाय.
टोमॅटो
टोमॅटो केवळ तुमच्या त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करत नाही तर त्याला सुरकुत्या दूर करण्यासही मदत करते. टोमॅटोच्या लगद्यामध्ये लिंबाचे काही थेंब टाकून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. सुमारे अर्ध्या तासानंतर त्वचा स्वच्छ करा.
ग्रीन टी
ग्रीन टीच्या पिशव्या वापरल्यानंतर त्या फ्रीजमध्ये ठेवा. या पिशव्या थंड झाल्यावर डोळ्यांवर ठेवा. यामुळे तुमची सुरकुत्याची समस्या दूर होईल. याशिवाय ग्रीन टीचा रोजच्या आहारामध्ये समावेश करणे अधिक फायदेशीर आहे.
एवोकॅडो
एवोकॅडोचा लगदा बाहेर काढा आणि चांगले मॅश करा. डोळ्याभोवती लावा आणि मालिश करा. सुमारे 15-20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर ते पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय दर आठ दिवसातून किमान दोन वेळा तरी करायला हवाच.
बदाम तेल
सुरकुत्याची समस्या दूर करण्यासाठी बदामाचे तेल देखील खूप गुणकारी मानले जाते. झोपण्यापूर्वी तोंड चांगले धुऊन, बदामाच्या तेलाने डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला मसाज करा, हलक्या हातांनी मसाज करा आणि रात्रभर तसेच राहूद्या.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Skin Care : या घटकांसह घरीच नैसर्गिक ब्लीच बनवा आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा मिळवा!
Health Care Tips : उन्हाळ्यात दररोज खा दही, हे 4 फायदे नक्कीच होतील!