केसांमध्ये कोंड्याची समस्या? लिंबाच्या वापराने करा ही समस्या दूर!

केसांत कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु, जर आपण ही समस्या वेळेत सोडवली नाही तर, ती कायम स्वरूपी त्रासदायक ठरू शकते.

केसांमध्ये कोंड्याची समस्या? लिंबाच्या वापराने करा ही समस्या दूर!
अॅपल व्हिनेगर एक नैसर्गिक क्लीन्सर म्हणून ओळखले जाते. हे केसांवर लावण्याने केवळ केस चांगले आणि मऊ राहतात. केस स्ट्रेट करण्यासाठी दोन कप पाण्यात 3 चमचे अॅपल व्हिनेगर घालावे. त्यानंतर अर्ध्या तासांनी केस धुवा. यामुळे आपले केस स्ट्रेट होण्यास मदत होईल.
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 4:10 PM

मुंबई : केसांत कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य आहे. परंतु, जर आपण ही समस्या वेळेत सोडवली नाही तर, ती कायम स्वरूपी त्रासदायक ठरू शकते. डोक्यातील कोंड्यामुळे फक्त आपले केस खराब नाहीत. तर, त्यासोबतच आपल्या चेहर्‍यावर, पाठीवर, खांद्यावरही बर्‍याच समस्या वाढतात. कोंड्याच्या समस्येमुळे तुमच्या नखांमध्येही बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला केसांतील कोंडा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत त्यामुळे तुमची कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. (To eliminate the problem of dandruff in the hair Lemon is beneficial)

-डोक्याच्या केसात कोंडा झाला असेल तर दोन चमचे खोबरेल तेल, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन कापराच्या वडय़ांची पावडर एकत्र करून केसांच्या मुळाशी चोळून लावावे. दोन तासांनी केस धुवावे हे आठवड्यातून साधारण दोनदा केले तर केसांमधील कोंडा दूर होईल.

-एक वाटी दही घ्या आणि त्यामध्ये एका लिंबाचा रस घाला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. वीस मिनिटांनंतर हे पेस्ट केसांना लावा साधारण 20 ते 25 मिनिटे तसेच ठेवा आणि त्यानंतर केस धुवून टाका. हे आठवड्यातून दोनदा केले तर केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होईल.

-कोंड्याची समस्या मिटवण्यासाठी लिंबू आणि नारळ तेल उपयोगी ठरते. यासाठी आपल्याला 2-3 चमचे नारळ तेल आणि एका लिंबाची आवश्यकता आहे. प्रथम एका वाडग्यात 2 ते 3 चमचे नारळाचे तेल घ्या आणि त्यात लिंबाचा रस घाला. जेव्हा दोन्ही घटक चांगले मिसळले जातील, तेव्हा हे मिश्रण कॉटन बॉलच्या सहाय्याने केसांच्या मुळांवर लावा.

-तुमच्या डोक्यात कोंडा जास्त प्रमाणात झाला असेल तर तुम्ही केसांच्या मुळाला सरळ लिंबू लावले तरी केसांमधील कोंडा दूर होईल. मात्र, लिंबू लावल्यानंतर काही वेळेतच लगेच केस धूणे आवश्यक आहे अथवा याचे गंभीर परिणाम देखील होऊ शकतात.

-केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी, केस स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर केला जातो. यामुळे टाळूच्या त्वचेवर जमा झालेली दुर्गंधी आणि अतिरिक्त तेल स्वच्छ होण्यास मदत मिळते. शॅम्पूचा आवश्यकतेपेक्षाही अधिक उपयोग केल्यास केसांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

(डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(To eliminate the problem of dandruff in the hair Lemon is beneficial)

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...