Skin Care Tips : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी दह्याचे ‘हे’ 4 फेसपॅक नक्की ट्राय करा!

दही ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरात सहज उपलब्ध असते. आरोग्याच्या दृष्टीने दहीचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की दही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर दही त्वचेवर वापरले तर चेहऱ्याला पोषण मिळते आणि सर्व समस्या दूर होण्यास मदत देखील मिळते.

Skin Care Tips : सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी दह्याचे 'हे' 4 फेसपॅक नक्की ट्राय करा!
फेसपॅक
Follow us
| Updated on: Oct 13, 2021 | 8:30 AM

मुंबई : दही ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरात सहज उपलब्ध असते. आरोग्याच्या दृष्टीने दह्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की दही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जर दही त्वचेवर वापरले तर चेहऱ्याला पोषण मिळते आणि सर्व समस्या दूर होण्यास मदत देखील मिळते. पण जर काही गोष्टी दह्यामध्ये मिसळल्या गेल्या तर त्याचे फायदे अनेक पटीने वाढतात.

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी

दीड चमचा दही, एक चमचा कॉफी पावडर, एक चमचा तांदळाचे पीठ आणि मध एकत्र करून मानेपासून चेहऱ्यावर लावा. आपण दहीचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. सुमारे 20 मिनिटांनी चेहरा धुवा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. यामुळे चेहऱ्याला चमक येते. चेहऱ्यावरील घाण साफ केल्याने मृत त्वचा काढून टाकली जाते आणि त्वचेला ओलावा मिळतो.

त्वचा मऊ करण्यासाठी

एक चमचा दही, दोन चमचे मुलतानी माती, एक चिमूटभर हळद आणि एक छोटा चमचा गुलाबपाणी मिसळून त्वचेवर लावा. साधारण 15 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. काही दिवस असे केल्याने तुमची त्वचा खूप मऊ होईल. त्वचेचा रंग उजळण्यास सुरवात होईल आणि डागांची समस्या दूर होईल.

मुरुमाची समस्या

दोन चमचे दही, 1/4 चमचे दालचिनी पावडर, एक चमचा मध मिसळा. हे सर्व चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 15 मिनिटे सोडा. त्यानंतर चेहरा धुवून पुसून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा. या पॅकमुळे तुमची त्वचा पूर्णपणे हायड्रेट होईल आणि चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास नक्की मदत होईल.

तेलकट त्वचेसाठी

एका वाडग्यात एक चमचा दही, दोन चमचे बेसन, दोन ते तीन थेंब लिंबाचा रस आणि एक चमचा गुलाबपाणी घेऊन ते चांगले मिक्स करा. ते मानेपासून संपूर्ण चेहऱ्यापर्यंत लावा. चेहऱ्यावर सुमारे 20 मिनिटे सोडा, त्यानंतर त्वचा धुवा. तेलकट त्वचेसाठी हा पॅक खूप चांगला मानला जातो. चेहऱ्याचा रंग उजळतो आणि धुळीचे कण स्वच्छ करतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Try these 4 face packs of curd to get glowing skin)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.