चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा !

धूळ आणि प्रदूषण याचा सरळ परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, मुरुम आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवते.

चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा !
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 8:52 AM

मुंबई : धूळ आणि प्रदूषण याचा सरळ परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. यामुळे चेहऱ्यावर पुरळ, मुरुम आणि खाज सुटण्याची समस्या उद्भवते. बऱ्यावेळा आपणा चेहरा लालसर होतो आणि खाज देखील सुटते. अनेक आैषधे घेऊन सुध्दा चेहऱ्यावरील लालसर पणा कमी होत नाही. चेहऱ्यावरील लालसरपणामुळे तुम्ही देखील त्रस्त असाल तर आम्ही आपल्याला असे काही घरगुती उपचार सांगणार आहोत ज्याचा वापर करून आपण काही वेळातच चेहऱ्यावरील लालसर पणा दूर करू शकतो. (Try these home remedies tips to reduce redness on the face)

कोरफड ही वनस्पती आपल्या थंडावा देण्याच्या गुणांमुळे ओळखली जाते. ‘बहुगुणी’ असणाऱ्या कोरफडीचा वापर बऱ्याचश्या सौंदर्यवर्धक उत्पादनांमध्ये देखील केला जातो. अगदी कुठल्याही ऋतूत कोरफडीचा वापर करता येतो. कोरफडाच्या पानांमध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी, ई आणि फॉलिक अॅसिड यांसारखी पोषक तत्व आढळतात.

आरोग्याच्या दृष्टीने कोरफडाची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. चेहऱ्यावरील लालसरपणामुळे तुम्ही त्रस्त असाल तर कोरफडचा रस आपल्या चेहऱ्याला लावा आणि 20 ते 30 मिनिटे तसेच ठेवा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील लालसरपणा कमी होईल.

-‘टी ट्री ऑईल’ हे त्वचेच्या समस्येसा बराच काळ दूर ठेवण्यासाठी वापरले जाते. आजकाल टी ट्री ऑईलचा वापर अँटी डँड्रफ शॅम्पू, परफ्यूम, हँडवॉशेससह अनेक त्वचेच्या उत्पादनांमध्येही केला जातो. टी ट्री तेलाचा वापर केल्याने त्वचेची जळजळ आणि इतर समस्याही कमी होतात. ‘टी ट्री ऑईल’ हे चेहऱ्यावरील लालसर त्वचेला लावले तर चेहऱ्यावरील लालसर पणा कमी होईल.

-स्किनकेअर प्रोडक्ट्समध्ये मुख्य सामग्रीमध्ये विटामिन सी असते. बहुतांश लोक विटामिन सी प्रोडक्ट्सचा वापर चमकदार त्वचेसाठी करतात. याशिवाय विटामिन सी मध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुण असतात जे त्वचेवरील रेडनेस कमी करण्यासाठी मदत करतात. विटामिन सी प्रोडक्ट्स लावण्यापूर्वी

-नारळाचे तेल त्वचेसाठी नेहमीच फायदेशीर असते. हे चेहऱ्यावर मॉईश्चरायझर म्हणून काम करते जे त्वचेची अॅलर्जी दूर ठेवण्यास मदत करते. त्वचेची खाज आणि लालसरपणा कमी करते. यासाठी एका भांड्यात थोडे नारळाचे तेल घेऊन त्वचेच्या अॅलर्जी झालेल्या भागावर लावा आणि एक तास ठेवा. दिवसातून कमीत कमी 4 ते 5 वेळा लावा. यामुळे स्किन अॅलर्जीपासून सुटका मिळेल.

-चिकनपॉक्स म्हणजेच कांजण्या या वेरिसेला जोस्टर नामक व्हायरसमुळे होतात. हा एक संसर्गजन्य रोग आहे. जो सर्दी आणि फ्लूसारखा पसरतो. या रोगाचा प्रभाव 10 ते 21 दिवस राहतो. चिकनपॉक्समुळे त्वचेवर काळे-लाल डाग पडतात. ज्यामुळे जळजळ होते आणि रूग्णाला खाज असह्य होते. या काळ्या डागांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही टी ट्री तेलाचा वापर करू शकता. या समस्येवरही टी ट्री तेलातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण उपयोगी पडतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

(Try these home remedies tips to reduce redness on the face)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.