Skin Care Tips : मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पाहा! 

पुरळ ही एक सामान्य समस्या आहे. बरेच लोक पुरळची समस्या दूर करण्यासाठी बाजारातील उत्पादने वापरतात. मात्र, बाजारातील अनेक उत्पादने वापरू सुध्दा पुरळची समस्या दूर होत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय नेहमी केले पाहिजेत.

Skin Care Tips : मुरुमाची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करून पाहा! 
त्वचा
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 7:54 AM

मुंबई : पुरळ ही एक सामान्य समस्या आहे. बरेच लोक पुरळची समस्या दूर करण्यासाठी बाजारातील उत्पादने वापरतात. मात्र, बाजारातील अनेक उत्पादने वापरू सुध्दा पुरळची समस्या दूर होत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय नेहमी केले पाहिजेत. ज्यामुळे पुरळची समस्या दूर होण्यास मदत होते. (Try these home remedies to get rid of acne)

मुलतानी माती आणि आले

एक चमचा किसलेले आले घ्या आणि ते ब्लेंडरमध्ये ठेवा. थोडे पाणी घालून एकत्र करून पेस्ट बनवा. त्यात थोडी मुलतानी माती आणि गुलाब पाणी घाला. हे दोनही व्यवस्थित मिक्स करून चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा पॅक आपण सतत आठ दिवस लावला तरी देखील आपल्या चेहऱ्यावरील मुरूम दूर जाण्यास मदत होते.

कोरफड आणि लसणाचा रस

लसणाच्या 3-4 ताज्या पाकळ्या सोलून ठेचून घ्या आणि रस काढण्यासाठी पिळून घ्या. लसणाच्या रसामध्ये दोन चमचे कोरफड जेल किंवा रस घाला आणि एकत्र करा. त्वचेवरील पुरळवर हा रस लावा. थोड्यावेळ हलक्या हातांनी चेहऱ्याचा मसाज करा. साध्या पाण्याने धुण्यापूर्वी 10-15 मिनिटे त्वचेवर सोडा. त्यानंतर पाण्याने आपला चेहऱ्या धुवा.

चंदन, दही आणि हळद

एक चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा चंदन पावडर मिसळा. त्यात थोडे साधे दही घाला आणि ते एकत्र मिसळून अँटी अँनी फेस पॅक तयार करा. हे सर्व चेहऱ्यावर लावा आणि स्वच्छ पाण्याने धुण्यापूर्वी 20-30 मिनिटे सोडा. यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.

कोरफड, मध आणि टोमॅटो

एका वाडग्यात दोन चमचे कोरफड जेल घ्या. त्यात एक चमचा मध आणि ताज्या टोमॅटोचा रस घाला. ते एकत्र करा आणि मिश्रण चेहऱ्यावर लावा. काही मिनिटांसाठी हळूवारपणे मालिश करा. ते 15-20 मिनिटे सोडा आणि नंतर ताजे, थंड पाण्याने धुवा. मुरुमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा करू शकता.

पपईचा रस

ताजे, मध्यम आकाराचे पपईचे काही तुकडे करा. पपईचा लगदा बनवण्यासाठी त्यांना ब्लेंड करा. नंतर चाळणीच्या मदतीने पपईचा लगदा काढून एका भांड्यात काढून घ्या. पपईचा रस थेट त्वचेवर लावा. हलके मालिश करा आणि 15-20 मिनिटे सोडा. साधे पाणी वापरून धुवा. दिवसातून एकदा किंवा दोनदा हा उपाय पुन्हा करा.

टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Try these home remedies to get rid of acne)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.